अरे वा ! चक्क 12 वा खेळाडू बॅटिंगसाठी मैदानात, सगळे ‘अवाक’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांमध्ये अनेक वेळा बारावा खेळाडू आपल्याला क्षेत्ररक्षण करताना दिसून येतो. मात्र तो त्या सामन्यात कधीही फलंदाजी करू शकत नाही. मात्र काल इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या अ‍ॅशेसमधील दुसऱ्या कसोटी सामन्यात हि गोष्ट पाहायला मिळाली. यापूर्वी क्रिकेटच्या इतिहासात हि गोष्ट घडली नव्हती. मात्र या सामन्यात हि गोष्ट घडल्याने इतिहास निर्माण झाला.

या सामन्यातील तिसऱ्या दिवशीच्या खेळामध्ये ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ हा इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरच्या उसळत्या चेंडूवर जखमी झाला. मात्र त्याने या वेदनेतून सावरत शेवटी फलंदाजी केली आणि या सामन्यात ९२ धावा केल्या. मात्र त्यानंतर त्याला दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी येण्यास त्रास होऊ लागल्याने त्याच्या जागी १२ खेळाडू मार्न्स लाबुशेन हा फलंदाजीसाठी मैदानात उतरला. त्यामुळे कसोटी सामन्यांच्या इतिहासात १२ वा खेळाडू असूनही सामना खेळण्याचा इतिहास मार्न्स लाबुशेन याच्या नावावर झाला. नुकतेच आयसीसीने निर्णय घेतला कि, जर एखादा खेळाडू जखमी झाला तर त्याच्याऐवजी १२ व्या खेळाडूला खेळण्याची परवानगी दिली होती. १ ऑगस्टपासून हा नवीन नियम लागू झाला आहे. या सामन्यात स्मिथच्या जागी संधी मिळालेल्या लाबुशेन याने फायदा उठवत ५९ धावांची सुरेख खेळी आणि ऑस्ट्रेलियाला हा सामना अनिर्णित करण्यात मदत केली.

दरम्यान, या सामन्यात जखमी झालेल्या स्मिथने तिसऱ्या कसोटी सामन्यातून माघार घेतली असून लाबुशेन याच्या खेळीने त्याच्या जागी संधी मिळण्याची शक्यता आहे. मात्र १४२ वर्षांच्या कसोटी इतिहासात तो पहिला बदली खेळाडू ठरला आहे ज्याने त्या सामन्यात फलंदाजी केली.

आरोग्यविषयक वृत्त

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like