पुण्यात फाईव्हस्टार हॉटेलमध्ये झालं होतं लग्न, ‘कोरोना’मुळे दोघांचा मृत्यू तर 25 जण पॉझिटिव्ह !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनामुळे सरकारनेही सर्व खासगी कार्यक्रमांवर बंधणे घातली आहेत. मात्र सतत सूचना देऊनही अनेक जण या नियमांचे उल्लंघन करत असल्याच्या घटना घडत आहेत. पुण्यात लॉकडाऊनमध्ये चक्क फाईव्हस्टार हॉटेलात लग्नाला गेलेल्या दोघांचा मृत्यू झाला आहे. त्याशिवाय 25 जणांना कोरोना झाल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे पोलिसांनी पंचतारांकित हॉटेलला नोटीस दिली असून आयोजकांवर गुन्हा दाखल केला आहे.

नगर रस्त्यावरील ‘हयात रिजन्सी’ या पंचतारांकित हॉटेलमध्ये ही घटना घडली आहे. पोलिसांनी हॉटेलला नोटीस दिली आहे. तब्बल 250 लोकांच्या उपस्थितीत हा लग्न सोहळा पार पडला होता. शिवसेनेचे उपशहर प्रमुख आनंद गोयल यांनी याविरुद्ध येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यामुळे आता पोलिसांनी घटनेचा तपास सुरु केला आहे. हॉटेलमध्ये उपस्थित असलेल्याला कोरोना झाला होता. त्यापैकी दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याशिवाय त्यांच्या संपर्कात आलेल्या 25 जणाांना कोरोना झाल्याचे उघडकीस आले आहे. त्यानुसार पोलिसांनी आता तपास सुरु केला आहे . दरम्यान, राज्यात सध्या 10 लाख 4233 व्यक्ती घरात विलीगिकरणात आहेत. त्याशिवाय 35 हजार 648 व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत. एक लाख 48 हजार 553 ऍक्टिव्ह रुग्ण संख्या आहे.