Marriage Bank Loan | लग्न थाटामाटात करायचंय? मिळू शकते लोन, बँकेत जाण्याचीही नाही गरज, Online असं करा Apply

0
633
Marriage Bank Loan | how to apply marriage loan online who can tack loan and what is intrest rate
file photo

मुंबई : Marriage Bank Loan | आपलं लग्न थाटामाटात व्हावं असं प्रत्येकालाच वाटतं. पण काहीवेळा आर्थिक अडचणीमुळे ते शक्य नसतं. लग्नासाठी अचानक इतकी मोठी रक्कम उभी करणे सर्वांसाठी सोपे नसते. आयुष्यात एकदाच येणारा हा सोहळा, थाटात व्हावा असे तुम्हालाही वाटत असेल आणि आर्थिक अडचण असेल तर काय करायचे, याबाबत आज आम्ही सांगणार आहोत. (Marriage Bank Loan)

लोन घेऊन तुम्ही थाटामाटात लग्न करू शकता. ही इच्छा पूर्ण करण्यासाठी बँकेकडून लोन घेता येते. बँकेत जाण्यासाठी वेळ नसेल तर ऑनलाइन अर्ज देखील करता येतो. त्यासाठी कोणतीही चिंता करण्याची आवश्यकता नाही. दर महिन्याला ईएमआय (EMI) भरून हे लोन फेडता येते.

IDFC बँकेत लग्नासाठी कर्ज हवे असल्यास ऑनलाइन अर्ज करू शकता. यासाठी बँकेच्या वेबसाइटवर भेट देऊन अप्लाय पर्याय निवडा. पिनकोड, मोबाईल नंबर आणि जन्म तारीख अपलोड करा. त्यानंतर सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्र जमा करा. (Marriage Bank Loan)

लग्नासाठी IDFC लोनची वैशिष्ट्ये

– लोन फेडण्याचा कालावधी 6 महिने ते 60 महिने
– पर्सनल लोन 1 लाख रुपयांपर्यंत मिळते
– 10.49 टक्के व्याजदर
– प्रोसेसिंग फी आणि ईएमआय 9,263 रुपये लागतात
– एक लाखासाठी साधारण 2,149 रुपये ईएमआय

प्रत्येक बँकेचा ईएमआय आणि इंटरेस्ट रेट वेगळा असू शकतो. तसेच प्रोसेसिंग फी वेगळी असते.
त्यामुळे मॅरेज लोन घेताना प्रथम चौकशी करूनच ते घ्या.
कमी व्याजदर असलेल्या बँकेचे लोन घेता आले तर जास्त फायदा होईल.
साधारण 21 ते 23 वर्षांपासूनचे तरुण यासाठी अर्ज करू शकतात.
तर वयाच्या 60 व्या वर्षापर्यंत तुम्ही पर्सनल लोनसाठी अर्ज करू शकता.
फक्त तुम्ही कमवते असणे आवश्यक आहे.
दर महिन्याला 15 हजार रुपयांपर्यंत कमवत असल्यास लोन मिळू शकते.

Web Title :-  Marriage Bank Loan | how to apply marriage loan online who can tack loan and what is intrest rate

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Supriya Sule | कवितेच्या माध्यमातून खा. सुळेंचे संभाजी भिडेंवर टीकास्त्र ‘तू लाव टिकली, परंपरेच्या बाजारात अक्कल आम्ही विकली‘

MNS | ’50 खोके सामाना ‘OK’, शिंदे-फडणवीस सरकारच्या जाहिरातीवर मनसेचा शिवसेनेला खोचक टोला