‘नागिन’ डान्स करण्यात ‘टुल्ल’ झाला नवरदेव, ‘मंगळाष्टीका’ सुरू झाल्यानंतर नवरीनं केलं ‘असं’ काही

लखीमपुर खीरी (उत्तर प्रदेश) : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशच्या लखीमपुर खीरीमध्ये नवरदेवाला दारूच्या नशेत नागीण डान्स करणे चांगलंच महागात पडलं आहे. यामुळे संतप्त झालेल्या वधूने लग्न करण्यास नकार दिला.

लखीमपूरच्या खिरी जिल्ह्यातील मैलानी परिसरात शुक्रवारी ही घटना घडली. लग्नाच्या स्टेजवरच नवरदेव मित्रांसह नागिन डान्स करू नाचू लागला. वरमालाला घालण्यासाठी उशीर झाल्याचे पाहून वधूच्या नातेवाईकांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र यावर त्याने त्यांच्याशी गैरवर्तन करण्यास सुरवात केली. वरमाला घालल्यानंतरही नवरदेवाने पुन्हा डान्स फ्लोअरवर उडी घेतली व नागिन डान्स सुरु केला. नवरदेवाचे हे सर्व वर्तन पाहून संतप्त झालेल्या वधूने तात्काळ लग्न मोडण्याचा निर्णय घेतला .

नवरदेवाला या घटनेची माहिती मिळाल्यावर त्याने नवरीच्या कानाखाली मारली. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाली. त्यांनी तात्काळ तिथे धाव घेतली. लग्नात दिलेल्या भेटवस्तू परत केल्यानंतर दोन्ही कुटुंबीयांनी पोलिसांत परस्परविरोधी तक्रार न करण्याचा निर्णय घेतला.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like