ब्रँडेड कुंकू वापरल नाही म्हणून चक्क लग्नच मोडलं, चौघावर FIR दाखल

पालघरः पोलीसनामा ऑनलाईन – लग्न ठरल्यानंतर टीळा लावण्याच्या कार्यक्रमात ब्रँडेड कुंकू वापरले नसल्याचे कारण देत चक्क लग्नच मोडल्याची धक्कादायक घटना पालघर जिल्ह्यात घडली आहे. या प्रकरणी नवरा मुलगा त्याचे आई-वडिल, काका विरोधात वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वसई येथे राहणा-या सुदाम उर्फ सुधाकर विठ्ठल पाटील यांच्या सिव्हिल इंजिनिअर असणाऱ्या मुलाचे लग्न वाडा तालुक्यातील एका सुसंस्कृत कुटुंबातील उच्चशिक्षित मुलीबरोबर ठरवले होते. लग्न जमवण्यासाठी मुलाचे काका कमलाकर पाटील यांनी पुढाकार घेतला होता. त्या अनुषंगाने हे लग्न जमल्यानंतर 30 ते 40 लोकांच्या उपस्थितीत टीळा लावण्याचा कार्यक्रम झाला. त्यावेळी नवरी मुलीच्या वडिलांनी नवऱ्याकडील मंडळींचे यथोचित स्वागत केले होते. मात्र, दुसऱ्या दिवशी लग्नाची तारीख ठरविण्यासाठी नवरी मुलीच्या वडिलांनी नवऱ्या मुलाला व त्याच्या काकांना विचारणा केली असता मुलाने कार्यक्रमात ब्रँडेड कुंकू वापरले नसल्याचे कारण देत चक्क आपल जमणार नसल्याचे सांगितले, अशी प्रतिक्रिया नवरीकडच्या मंडळींनी दिली आहे.