जर पती-पत्नीची ‘राशी’ असेल ‘समान’ तर असे ‘वैवाहिक’ जीवन असेल असं, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – हिंदु धर्मात विवाह योग्य मुहूर्तावर केला जातो. मुला मुलीची कुंडली पाहिली जाते. याशिवाय मुला मुलीची रास कोणती हे देखील पाहिले जाते. त्यामुळे जर मुला-मुलीची राशी एकसमान असेल तर त्याचा त्यांच्या नात्यावर परिणाम देखील होत असतो. त्यामुळे अनेकदा प्रश्न उपस्थित होतात की एकसमान राशी असलेल्याशी विवाह करायला हवा की नको. ज्योतिष शास्त्रात 12 राशी सांगण्यात आल्या आहेत. या सर्व राशींचा स्वामी वेगवेगळा असतो आणि त्याआधारेच लोकांचा स्वभाव बदलतो. त्याचा परिणाम वैवाहिक जीवनावर होतो.

मेष – ( ग्रह स्वामी – मंगळ)
ज्योतिष शास्त्रानुसार या राशीचे लोक मेहनती असतात, जर या व्यक्तीशी विवाह केल्यास जीवनात तात्काळ सुख येते.

वृषभ – (ग्रह स्वामी – शुक्र)
या समान राशीच्या लोकांचा विवाह झाला तर त्याचे जीवन प्रेममय असते. असे ही सांगितले जाते की ते प्रेमळ असतात, त्याचे वैवाहिक जीवन अत्यंत कुशल, मंगळ असते.

मिथुन – (ग्रह स्वामी – बुध)
या दोन समान राशीच्या लोकांचा विवाह झाला तर यांच्या जीवनात सुखाचे थोडी कमी राहते. याचे कारण आहे की हे लोक शांत स्वभावाचे असतात, परंतु अधिक चिंतित असतात.

कर्क (ग्रह स्वामी – चंद्र)
अशा दोन राशीच्या व्यक्तींचा विवाह झाला तर अधिक वाद विवाद होण्याची शक्यता असते.

सिंह (ग्रह स्वामी- सूर्य)
सिंह रास असलेल्या दोघांनी जर लग्न केले तर काही वेळेला त्यांच्यामध्ये वाद होऊ शकतो. पण सहसा त्यांच आयुष्य सुखी असते.

कन्या (ग्रह स्वामी – बुध)
या समान राशीच्या लोकांचा विवाह झाल्यास त्यांच्यात असंतृष्ट भाव राहतो.

तुला (ग्रह स्वामी – शुक्र)
या समान राशीच्या लोकांचा विवाह झाल्यास त्यांचे जीवन सुखी राहते.

वृश्चिक (ग्रह स्वामी – मंगळ)
जर यात समान राशीच्या लोकांचा विवाह झाला तर त्यांच्यात अधिक वाद होत राहतात. त्यांच्यात चिंता आणि तणाव राहतो.

कन्या (ग्रह स्वामी – बुध)
या समान राशीच्या लोकांचा विवाह झाल्यास त्यांच्यात असंतुष्ट भाव राहतो.

तुळ (ग्रह स्वामी – शुक्र)
या राशीच्या लोकांचा विवाह झाला तर त्यांचे वैवाहिक जीवन अत्यंत सुखी असते.

धनु (ग्रह स्वामी – गुरु)
या समान राशीच्या लोकांचा विवाह झाला तर त्यांचे वैवाहिक जीवन अत्यंत सुखी राहते. त्याचा विवाह सफल होतो.

मकर (ग्रह स्वामी – शनि)
जर या समान राशीच्या लोकांचा विवाह झाला तर त्यांचे वैवाहिक जीवन सुखी राहते.

कुंभ (ग्रह स्वामी – शनि )
या राशीचे लोक मेहनती असतात. जर त्यांचा विवाह झाला तर त्याचे जीवन आनंदी राहते.

मीन (ग्रह स्वामी – गुरु)
जर या दोन राशीच्या लोकांचा विवाह झाला तर त्यांचे दांपत्य जीवन सुखी राहते.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/