‘त्याच्या घरातलं लग्न नाही, मग हे नाचतंय का’ ? आंबेडकरांचा राज ठाकरेंना टोला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – एकीकडे राज ठाकरे यांचा ‘लावा रे तो व्हिडीओ’ यावरून सोशल मीडियावर भन्नाट मिम्स व्हायरल होत असताना वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या सभांवरुन त्यांना लक्ष्य केलं आहे. ” हे काय नाचतय पुढं पुढं … कोणासाठी नाचतंय ?लग्न कोणाचं हे नाचतंय कोणासाठी ? असा थेट सवाल आंबेडकर यांनी विचारला आहे.

अहमदनगर येथे बहुजन वंचित आघाडीच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी बोलताना आंबेडकर म्हणाले, ” लग्न त्यांच्या घरातलं नाही, मग ते नाचतंय का? हेच मला कळत नाही. आपल्या स्वत:च्या घरातय, मग आनंदय म्हणून आपण नाचतो. आता, हे त्यांच्या घरात लग्न नाही. मग, हे नाचतंय कोणासाठी, हे तर त्यांनी सांगाव?” अशा शब्दात प्रकाश आंबडेकरांनी राज ठाकरेंच्या सभांचा समाचार घेतला आहे.

मोदींवर टीका करताना आंबेडकर म्हणाले,  ‘मोदीजी तुम्ही स्वत:ला मागासवर्गीय म्हणता, मग त्यांच्यासाठी काय केलं ते सांगा शिवाय स्वत:चे स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट काढून जाहीर करावे, म्हणजे सर्वांना कळेल की तुम्ही मागासवर्गीय आहात की नाहीत,’ अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली.

‘लाव रे तो व्हिडीओ’ वरून सोशलवर धुमाकूळ
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभांमधून व्हिडीओ दाखवत भाजपावर टीका करताना मुख्यत: पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य करताना पाहायला मिळत आहेत. यातून सोशल मिडीयावर देखील लाव रे तो व्हिडीओ हे राज ठाकरेंचे वाक्य जोरदार धुमाकूळ घालतंय. त्यावर, प्रकाश आंबेडकर यांनी टीका केली आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like