31 वर्षाच्या ‘घोड’ नवर्‍याशी अल्पवयीन मुलीचे लावले लग्न; मुलाच्या जन्मानंतर आईवडिलांसह पतीविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे : एका ३१ वर्षाच्या घोड नवर्‍याबरोबर अल्पवयीन मुलीचे लग्न (Marriage of a minor girl) लावून दिले. त्यांच्यातील शारिरीक संबंधातून ही मुलगी गर्भवती राहून तिने एका मुलाला जन्म दिला. ससून रुग्णालयात तिचे सिझरीन झाल्याने हा सर्व प्रकार समोर आला. त्यानंतर आता तिच्या पतीसह आईवडिलांवर चंदननगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

ही सर्व घटना खराडी येथील राजाराम पाटीलनगरात ३१ ऑगस्ट २०२० पासून ३ जून २१पर्यंत घडला आहे. ही मुलगी अल्पवयीन असल्याचे माहिती असतानाही तिच्या आई वडिलांनी व नातेवाईकांनी तिचा विवाह मांजरी येथे राहणार्‍या ३१ वर्षाच्या विलास याच्याबरोबर लावून दिले. ही मुलगी अल्पवयीन असल्याचे माहिती असताना त्याने तिच्याशी शारिरीक संबंध केले.

त्यातून ती गर्भवती राहिली़ लहान असल्याने या मुलीचे आयुष्यावर ही गर्भधारणा बेतू शकत होती.
तिला त्रास होऊ लागल्याने ३ जून रोजी तिला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले.
ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी तिची तपासणी केल्यावर त्यांना ही मुलगी अल्पवयीन असल्याचे आढळून आले.
५ जून रोजी सिझरीन ऑपरेशनद्वारे तिने एका मुलाला जन्म दिला.

ससून रुग्णालयाने याची माहिती पोलिसांना दिली.
पोलिसांनी चौकशी केल्यावर या मुलीचे वय तिच्या आधारकार्डनुसार १८ वर्षांपेक्षा कमी असताना तिचे लग्न लावण्यात आल्याचे आढळून आले.
त्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक भालचंद्र ढवळे यांच्या फिर्यादीवरुन चंदननगर पोलिसांनी तिचा पती, आईवडिल व इतर नातेवाईकांवर पोक्सो, बलात्कार, बालविवाह प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे.

हे देखील वाचा

Vaccination registration | मुंबईसह काही जिल्ह्यात लवकरच साप्ताहिक लसीकरण नोंदणी, ठाकरे सरकारची न्यायालयात ग्वाही

 

SIP : या स्कीममध्ये करा 4500 रुपयांची गुंतवणूक, बदल्यात मिळतील 1 कोटीपेक्षा सुद्धा जास्त; जाणून घ्या कसे?

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Marriage of a minor girl to a 31 year old husband