भारताचे लोक खूपच ‘जुगाडू’, लग्नात 50 पाहुण्यांना बोलविण्याच्या नियमांवर असा काढला ‘तोडगा’

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : कोरोना विषाणूचा परिणाम देशातील विविध क्षेत्रांमध्ये दिसून आला आहे आणि लग्नाचे आयोजनही यातून सुटलेले नाहीत. कोरोना संकटामुळे जाहीर झालेल्या लॉकडाऊनमुळे एप्रिल-मे मधील विवाहसोहळ्यांना ग्रहण लागले आहे. लॉकडाऊनमुळे मोठ्या संख्येने लोकांना लग्न समारंभ तहकूब करावे लागले. आता सरकारने विवाहसोहळा आयोजित करण्याची परवानगी दिली आहे, ज्यात केवळ 50 पाहुण्यांना आमंत्रित केले जाऊ शकते. भारतातील लोक इतके जुगाडू आहेत की, त्यांनी या नियमावरही तोडगा काढला आहे. विशेषत: पंजाबी विवाहसोहळ्यांमध्ये लोकांनी पाहुण्यांना बोलवण्याचा वेगळा मार्ग शोधून काढला आहे.

शाकाहारी चार ते सहा तर नॉनवेज वाल्यांची शिफ्ट सहा ते आठ पर्यंत
एप्रिल आणि मे मध्ये लग्न न झाल्याने जूनमध्ये विवाहसोहळ्यांचे फक्त सहा मुहूर्त बाकी होते. यापैकी एक मुहूर्त झाला असून आता केवळ पाच मुहूर्त शिल्लक आहेत. पंजाबमधील लोकांना लग्नात 50 लोकांच्या मर्यादेचे पालन करण्याचा वेगळा मार्ग सापडला आहे. हे लोक त्यांच्या नातेवाईकांना आणि पाहुण्यांना शिफ्ट वाईज बोलवत आहेत. जे शाकाहारी भोजन करतात त्यांना सायंकाळी चार ते सहाच्या शिफ्टमध्ये बोलावले जाते. अशा पाहुण्यांना राजमा आणि भटासह अनेक शाकाहारी पदार्थ दिले जात आहेत. तसेच मांसाहारी खाण्याची आवड असणाऱ्या नातेवाईक किंवा पाहुण्यांना संध्याकाळी सहा ते आठ या वेळेत आमंत्रित केले जात आहे. अशा पाहुण्यांसाठी मटण, चिकन, कबाब तसेच दारूचीही व्यवस्था केली जात आहे.

45 मिनिटांपेक्षा जास्त न थांबण्याचे आवाहन
गर्दी टाळण्यासाठी अतिथींना खास विनंती केली जात आहे. लग्नाच्या कार्यक्रमात 30 ते 45 मिनिटेच थांबावे, असे आवाहन केले जात आहे. त्यापेक्षा जास्त थांबू नका आणि इतर अतिथींना समारंभात उपस्थित राहण्याची संधी द्या. यामुळे समारंभात गर्दी होणार नाहीत.

प्रशासनापर्यंत पोहोचतायेत अशी अर्ज
पंजाबच्या जालंधरमध्ये जिल्हा प्रशासनापर्यंत असे अर्ज पोहोचत आहेत. अशा प्रकारे अतिथींना कॉल करण्याचे दोन फायदे आहेत. एक म्हणजे, लग्नसमारंभात गर्दी होत नाही आणि दुसरे म्हणजे या कार्यक्रमास अधिक पाहुण्यांना आमंत्रित करण्यात यश मिळवित आहे. माहितीनुसार, आतापर्यंत असे 11 अर्ज आलेले आहेत. अशा अर्जांना परवानगी देण्यास प्रशासनालाही काही हरकत नसल्याने योग्य ती परवानगी देण्यात येत आहे. असा कार्यक्रम आयोजित करणार्‍या व्यक्तीने म्हटले की, यामुळे कोरोनाच्या संसर्गाचा धोका देखील रोखू शकतो. यासंदर्भात जालंधरचे डीसी वरंदर कुमार शर्मा म्हणतात की, जर लोक अशा मार्गदर्शक सूचना पाळतात तर प्रशासनाला हरकत नाही. आपल्याला एवढेच सांगायचे आहे की समारंभात 50 हून अधिक लोकांची गर्दी असू नये. ते म्हणाले की, आम्ही या नियमांचे काटेकोरपणे पालन करीत आहोत.