प्रियकरानं प्रेयसीला ‘गोडीगुलाबी’नं बोलावलं, रेल्वे ट्रॅकजवळ गेल्यावर ‘भलतच’ केलं

जालना : पोलीसनामा ऑनलाईन – जालनामध्ये म्हाडा कॉलनीजवळील रेल्वे रुळाजवळ २१ डिसेंबरला संध्याकाळी ७ वाजता दीपाली शेंडगे या तरुणीचा मृतदेह सापडला आहे. पोलिसांनी आरोपी सचिन गायकवाड याला अटक करून एक धक्कादायक खुलासा केला आहे. दीपाली हिची निघृण हत्या करून तिला रेल्वे रुळावर ढकलल्याचे पोलिसांनी आरोपीकडून कबूल केले आहे.

दीपाली आणि सचिन यांचे प्रेमसंबंध असताना दीपाली हिने लग्न करून आपल्याला धोका दिला. तिला अद्दल घडवावी म्हणून आरोपीने तिची हत्या केल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. तसेच आरोपीने तिच्या पतीलाही या कटामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला होता.

आरोपी सचिनने आईस्क्रीम खायची म्हणून दीपालीला अंबड रोड येथे बोलावून तिच्याच गाडीवरून इंदेवाडी येथे तिला नेले. दीपाली हिने तिचे लग्न झाले असून आपल्यला भेटता येणार नाही. तेव्हा आरोपीने त्याला त्याच्या बायकोने सोडले असता तू लग्न का केले असा जाब विचारून तिच्या डोक्यात जड वस्तू घातल्याने ती बेशुद्ध पडली. नंतर आरोपीने तिला आपल्याच शरीराला ओढणीने बांधून रेल्वे रुळाजवळ नेले आणि रुळावर फेकून दिले. घटनास्थळी मृत तरुणीची स्कुटी, कॉलेज बॅग आणि मोबाईल सापडला आहे. तसेच आरोप आपल्यावर येऊ नये म्हणून आरोपीने तरुणीजवळ अविनाश वंजारे याच्यामुळे आत्महत्या करत असल्याची चिट्ठी सोडली. ज्यामुळे हत्येचा पूर्ण संशय अविनाश वंजारे आणि त्याच्या कुटुंबावर जाईल.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/