कौतुकास्पद ! 8 व्या वर्षी झालं लग्न, पतीनं अ‍ॅटो रिक्षा चालवून पत्नी ‘रूपा’ला बनवलं ‘डॉक्टर’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – प्रयत्नांती परमेश्वर ही म्हणं खरी करुन दाखवत राजस्थानातील एका लहानशा गावात राहत असलेल्या महिलेने डॉक्टर होण्यासाठी NEET ची प्रवेश परिक्षा पास केली. ही परिक्षा ही महिला नुसतीच पास झाली नाही तर ऑल इंडिया रॅंकिंगमध्ये (AIR) 2283 क्रमांक पटकावला. तर ओबीसी रँकिंगनुसार 658 व्या क्रमांकावर पोहोचली. या महिलेचे यासाठी कौतूक होत आहे की 8 व्या वर्षी लग्न झाल्यानंतर रुपा यादव या महिलेने आपले स्वप्न मागे न सोडता, फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेत सर्व आव्हाने पेलत NEET ही देशपातळीवर घेण्यात येणाऱ्या परिक्षेत बाजी मारली.

 

रुपा पहिल्यापासून अभ्यासात हुशार होती परंतु बाल विवाहामुळे तिचे शिक्षण काही काळ अडून राहिले होते. बाल विवाहावेळी रुपाचे वय फक्त 8 वर्ष होते आणि ती तिसरीच्या वर्गात होती. परंतु अभ्यासाप्रति गोडी आणि हारुन न जाण्याची जिद्द यामुळे ती गृहिणीपासून डॉक्टर हा प्रवास करु शकली. ती संघर्षाचे दिवस आठवत सांगते की एक काळ अशी परिस्थिती होती जेव्हा कुटुंबाची स्थिती नाजूक होती. शिक्षणासाठी पैसे नव्हते परंतु ती डगमगली नाही. शाळेपासून घराचे अंतर जास्त होते, ज्यासाठी तिला गावापासून 3 किलोमीटर दूर स्टेशनपर्यंत जावे लागत असे, तेथून ती बसमध्ये बसून शाळेत जात होती. या दरम्यान घरातील कामाचे देखील तिच्या समोर आव्हान होते.

डॉक्टरच का ? – रुपा सांगितले की योग्य वेळी उपचार न मिळाल्यामुळे तिचे काका भीमाराम यादव यांची हृद्यविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्यानंतर तिने बॉयोलॉजीचे शिक्षण घेत डॉक्टर बनण्याचा संकल्प केला होता. यानुसार तिने दिवस रात्र मेहनत करत NEET परिक्षा उत्तीर्ण केली.

यापूर्वी देखील पास झाली होती NEET परिक्षा –

रुपा यापूर्वी देखील NEET परिक्षा पास झाली आहे. 2016 मध्ये पहिल्यांदा NEET परिक्षा पास केली होती परंतु रॅंकनुसार तिला महाराष्ट्र राज्य मिळाले होते. जेथे पाठवण्यासाठी घरचे तयार नव्हते. यानंतर 2017 मध्ये ती पुन्हा NEET पास झाली होती, त्यानंतर आता पुन्हा तिने ऑल इंडिया रॅकिंगमध्ये 2283 व्या रॅंक मिळवली.

कुटूंबाने दिली साथ –

रुपा सांगते की लग्नानंतर तिची बहीण रुक्मा देवी आणि बहिणीचे पती बाबुलाल यांनी तिचा अभ्यासातील गोडवा पाहता तिला साथ दिली. सामाजिक अडचणी दूर करत तिने अभ्यासास सुरुवात केली. शिक्षणाचा खर्च उचलत दोघांनी शेती केली आणि टॅप्मो, रिक्षा चालवली. रुपाने जेव्हा डॉक्टर बनण्याची इच्छा पती आणि बहिणीचे पती बाबुलाल यांच्यासमोर व्यक्त केली तेव्हा त्यांनी तिला कोटाला कोचिंगसाठी पाठवले.

पत्नीला पाहून पतीने देखील केली शिक्षणास सुरुवात –

रुपा शिक्षण घेत असल्याचे पाहून पती शंकर लाल यादव यांनी देखील शिक्षण घेण्याची इच्छा बोलून दाखवली. ज्यानंतर दोघांनी शिक्षणास सुरुवात केली. सध्या शंकर एम ए च्या प्रथम वर्षात शिकत आहेत.