Pune : धक्कादायक ! विवाहित प्रेयसीला मित्रासोबत शरीरसंबध ठेवण्यास टाकला दबाव, तिनं नकार देताच पठ्ठयानं उचललं ‘हे’ पाऊल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – विवाहित प्रेयसी (Married lover) वर आपल्या मित्रासोबत शरीरसंबंध ठेवण्यास दबाव टाकला. प्रेयसीने त्याला नकार देताच प्रियकाने आणि त्याच्या मित्राने प्रेयसीच्या डोक्यात दगड घालून निर्घृण खून केला. एवढेच नाही तर तिचा मृतदेह गावच्या हद्दीत टाकून पसार झाले. ही धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यातील थोरांदळे गावात घडली आहे.

बँक बुडाली तर बुडणार 4.8 कोटी खात्यांवरील रक्कम, जाणून घ्या तुमचे डिपॉझिट सुरक्षित आहे किंवा नाही

 

मिळालेल्या माहितीनुसार, मयत महिला ही रांजणी येथे बाजरीच्या पिकाची राखण करण्यासाठी आली होती. त्यानंतर तिची ओळख आरोपीसोबत झाली. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर प्रियकरानं आपल्या प्रेयसीला मित्रासोबत शरीरसंबंध ठेवण्यासाठी तगादा लावला. त्यासाठी त्याने तिच्यावर दबाव देखील टाकला. मात्र, तिने त्याला नकार दिला. प्रियसीने नकार दिल्यानंतर आरोपीला राग आला. त्याने तिला संपवण्याचा कट रचला.

…म्हणून 2 मुलींची आई अन् शिक्षिका असेलेल्या महिलेकडून तरूणाला ब्लॅकमेल, अखेर युवकानं केली आत्महत्या

प्रियसीने आपल्या मित्रासोबत शरीरसंबंध ठेवण्यास नकार दिल्याने आरोपीने त्याच्या मित्राच्या मदतीने तिच्या डोक्यात दगड घालून खून केला. त्यानंतर तिचा मृतदेह आंबेगाव तालुक्यातील थोरांदळे गावच्या हद्दीत टाकून फरार झाले. गावातील नागरिकांनी महिलेचा मृतदेह पाहिल्यानंतर याची माहिती मंचर पोलिसांना दिली. मंचर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करुन आरोपींचा शोध सुरु केला.

TATA ग्रुपने बिग बास्केटमध्ये खरेदी केली मोठी भागीदारी, Amazon आणि Flipkart ला मिळणार ‘टक्कर’

 

पोलिसांनी आरोपी सुनील बबन भुतांबरे आणि विश्वनाथ गावबा (दोघे रा. मांजरवाडी, ता. जुन्नर) यांना अटक केली. तर या प्रकरणी मृत महिलेच्या आईने पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी सुरुवातीला अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करुन तपास केला. पोलिसांनी प्रियकरासह त्याच्या मित्राला अटक केली. आरोपींना घोडेगाव न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना 31 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Also Read This : 

29 मे राशीफळ : आज शुभयोग, ‘या’ 5 राशींना मिळणार यश, सहज होतील कामे, इतरांसाठी असा आहे शनिवार

कोरोनाला हरवण्यासाठी शास्त्रज्ञांनी शोधला नवा उपाय, आता ‘ही’ स्वस्त अन् मस्त उपचार पध्दती वापरणार

अंगावरचे दूध वाढवण्यास ‘हे’ ७ पदार्थ उपयुक्‍त, स्तनपानामुळं बाळ आणि आईला ‘फायदा’, जाणून घ्या

#YogaDay2019 : योगामुळे कमी होते नैराश्याची तीव्रता

अवैध दारुविक्री धंद्यावर कारवाईसाठी गेलेल्या पोलीस निरीक्षकासह 2 पोलिसांवर प्राणघातक हल्ला, प्रचंड खळबळ