…अन् त्याच्या भीतीपोटी तरुणीची आत्महत्या

बारामती : पोलिसनामा ऑनलाईन

विवाहित तरुणाने लग्नासाठी तगादा लावल्यामुळे १७ वर्षाच्या तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सदर घटना बारामती  तालुक्यातील माळेगावमध्ये नागतळे गावामध्ये घडली आहे . पोलिसांनी या प्रकरणी चार आरोपींवर आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e8a17b2c-cde2-11e8-b346-f1ba8788479e’]

मयत तरुणीच्या आईने बारामती तालुका पोलिस ठाण्यात गोंडे कुटुंबातील चौघांविरुद्ध फिर्याद दिली आहे . त्यानुसार ज्ञानेश्वर भीमराव गोंडे, सोन्या ज्ञानेश्वर गोंडे, गणेश ज्ञानेश्वर गोंडे आणि दादा ज्ञानेश्वर गोंडे अशी आरोपींची नावे असून पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे .

वडाळ्यात भरदिवसा दरोडा काजल ज्वेलर्समधून लुटले २ कोटी

मुलीच्या आईने दिलेल्या माहितीनुसार , ‘आरोपी सोन्या गोंडे अचानक आमच्या घरी आला. मुलीला लग्नाची मागणी घालत तिची छेडछाड करु लागला. घडलेल्या प्रकाराबाबत संबंधित मुलाच्या घरच्यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनीच आम्हाला मारहाण करुन गाव सोडून निघून जाण्याची धमकी दिली. त्यामुळे आलेल्या नैराश्य आणि भीतीपोटी मुलीने राहत्या घरात गळफास घेतली’, अशी तक्रार मयत तरुणीच्या आईने दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी चार आरोपींवर आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.

[amazon_link asins=’B01M0JSAFU,B0784D7NFX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d40d1f41-cde3-11e8-841c-0b38ea82dc18′]