विद्यार्थ्यासोबत रात्र घालवायची होती ‘त्या’ विवाहीत शिक्षिकेला, झाली 2 वर्षाची जेल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एका विद्यार्थ्याशी संबंध ठेवण्याच्या प्रयत्नात एका महिला शिक्षिकेला 2 वर्षाची तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ही बाब इंग्लंडच्या लीवरपूलची आहे. लीवरपूल क्राउन कोर्टाचे न्यायाधीश गॅरी वुडल यांनी 42 वर्षीय महिला शिक्षक बिटी मिलिगनविषयी सांगितले ‘मला पूर्ण समाधान आहे की तुम्हाला विद्यार्थ्याशी लैंगिक संबंध हवे होते.’

बिटी नावाच्या सहाय्यक अध्यापिका शाळेत प्रवेश घेतल्यानंतर काही दिवसांनी ती 15 वर्षाच्या विद्यार्थ्याकडे आकर्षित होऊ लागली. नियमांचे उल्लंघन करत तीने विद्यार्थ्याचा मोबाईल नंबरही घेतला. यानंतर महिला शिक्षिका विद्यार्थ्याला आक्षेपार्ह संदेश पाठवत असे.

महिला शिक्षिकेने विद्यार्थ्यासह रात्र घालविण्याच्या उद्देशाने हॉटेल बुक केले तेव्हा ही माहिती उघडकीस आली. यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले. ही महिला विवाहित असून 2 मुलांची आई आहे.

मात्र हे प्रकरण समोर आल्यानंतर तिचा नवरा वेगळा झाला. त्या महिलेच्या नात्याबद्दलची माहिती शाळेच्या दोन कर्मचार्‍यांनाही मिळाली. शिकवण्यापूर्वी ही महिला ब्युटी मसाजर सुद्धा राहिलेली आहे.

या महिलेने कोर्टात सांगितले की विद्यार्थ्याला अनेक अडचणी आहेत आणि ती त्याला विशेष मदत करीत आहे. हॉटेलच्या खोलीची बुकिंग करून तिने शिक्षकाची हद्द ओलांडली, परंतु लैंगिक संबंध ठेवण्याच्या तीचा कोणताही उद्देश नसल्याचे तिने स्पष्ट केले.

आरोग्यविषयक वृत्त –