ही अमेरिकेतील वकिल करते ‘पार्ट टाइम’ वेश्याव्यवसाय, व्यवसाय कायदेशीर करण्याची मागणी

अमेरिका : वृत्तसंस्था – एका गुन्हेगारी महिला वकिलाने एका टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे की ती पार्टटाइम वेश्या व्यवसायाचे काम करते. अमेरिकेच्या आयोवा येथील रहिवासी असलेल्या कॅथरीन सीअर्सने आशा व्यक्त केली आहे की तिची कहाणी सगळ्यांसमोर आल्यावर लैंगिक कामांना गुन्हेगारीच्या श्रेणीतून बाहेर काढण्यास मदत होईल. कॅथरीन देखील एका मुलाची आई आहे.

एका टीव्ही चॅनेलशी बोलताना कॅथरीन म्हणाली की नेवाडामधील एका वेश्यागृहात तिने केवळ 3 आठवड्यांत 40 लाख रुपये कमावले. तीने सुमारे 3 वर्षांपूर्वी पार्टटाइम वेश्या व्यवसायाचे काम सुरू केले.

नेवाडा येथे लैंगिक (Sex Work) कार्य कायदेशीर आहे. कॅथरिन म्हणाली की तिच्या नवऱ्याला या कामात कोणतीही अडचण नाही. तिने 4 महिन्यांपूर्वी मुलाला जन्म दिला आहे. मुलाच्या जन्मानंतर कॅथरीनने काही काळ वेश्या व्यवसायाची नोकरी सोडली. कॅथरीन म्हणते की आपण लैंगिक कामाबद्दल जितके जास्त बोलतो तितकेच ते गुन्हेगारीच्या श्रेणीतून वगळले जाण्याची शक्यता असते. जर आपण याबद्दल बोललो नाही तर कायदा बदलला जाऊ शकत नाही.

पत्नीच्या वेश्या व्यवसायाच्या कामाबद्दल पती जॉन म्हणतो की त्याला त्याबद्दल फारशी काळजी नाही. त्याचबरोबर कॅथरीन म्हणाली की लैंगिक कामाबद्दलच्या गैरसमज आणि पूर्वग्रहांविरूद्ध तिला काम करत राहावेसे वाटते.