ऑस्ट्रियाच्या राजकन्येचे 31 व्या वर्षी निधन, भारतीय शेफशी झालं होतं लग्न

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –   ऑस्ट्रियाच्या राजकुमारी मारिया गलिट्जाइन यांचे वयाच्या 31 व्या वर्षी निधन झाले आहे. एका अमेरिकन वृत्तसंस्थेने माहिती दिली की ह्यूस्टनमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. मारियाने भारतीय वंशाचे शेफ ऋषि रूप सिंगशी लग्न केले होते. यानंतर त्यांचे नाव बदलून मारिया सिंग असे झाले. व्यवसायाने इंटिरियर डिझाइन असणारी मारिया आपल्या कुटुंबासमवेत अमेरिकेच्या ह्यूस्टन येथे राहत होती. मारिया आणि ऋषि यांना दोन वर्षांचा मॅक्सिम नावाचा मुलगा देखील आहे.

एप्रिल 2017 मध्ये झाले होते लग्न

मारियाने एप्रिल 2017 मध्ये ऋषि बरोबर लग्न केले आणि त्यानंतर ती चर्चेत आली. ऋषि हा एक प्रसिद्ध शेफ आहे आणि ह्यूस्टनमध्ये काम करतो. 4 मे रोजी मारियाचा अचानक मृत्यू झाला आणि फॉरेस्ट पार्क वेस्टहायमर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. मारियाचा जन्म 1988 मध्ये लक्झेंबर्गमध्ये झाला होता. वयाच्या पाचव्या वर्षी ती रशियामध्ये गेली. ग्रॅज्युएशननंतर मारियाने बेल्जियमच्या आर्ट आणि डिझाईन कॉलेजमध्ये पुढील शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर ती अमेरिकेत स्थायिक झाली आणि शिकागो, इलिनॉयसारख्या ठिकाणी राहिली. मारिया तिचा मुलगा मॅक्सिमवर खूप प्रेम करत होती. मारिया काही दिवस ब्रुसेल्समध्ये देखील राहिली आहे.

चार्ल्स पहिला यांची वंशज

मारिया ही ऑस्ट्रियाचा राजा चार्ल्स पहिला यांच्या वंशजाची आहे, जे की ऑस्ट्रिया आणि हंगेरीच्या सिंहासनाचे शेवटचे वारस होते. पहिल्या विश्वयुद्धानंतर चार्ल्स प्रथमला काढून टाकण्यात आले होते. तथापि, त्यांची बहीण राजकुमारी तातियानाने ह्यूस्टन क्रॉनिकलला 2018 मध्ये सांगितले की त्यांचे पालन पोषण शाही पद्धतीने झालेले नाही. तातियाना म्हणाले होते, ‘आमचे जीवन पूर्णपणे सामान्य आहे. होय, जेव्हा जेव्हा आम्हाला शाही विवाहसोहळ्यांमध्ये आमंत्रित केले जात असे तेव्हा आम्हाला असे वाटायचे की आपण राजकन्या आहोत कारण त्यांच्या नावासमोर राजकन्या असे लिहिले जात असे.’