सहा लाखाच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन – निगडी, संजयनगर येथे माहेराहून सहा लाख रूपये आणावेत यासाठी सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या छळाला कंटाळून विवाहितेने ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.

सुरक्षा अमोल म्हस्के (२३) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. पती अमोल दत्तू मस्के (२६), सासरा दत्तू रामा मस्के (६२), सासू केसरबाई दत्तू मस्के (५५, सर्व रा. संजयनगर, ओटास्कीम, निगडी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरक्षा हीचे वडील लक्ष्मण नामदेव थोरात (४७, रा. भोरी भडक, दौंड) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

लग्नानंतर काही दिवसांनी पती आणि सासरच्या लोकांनी सुरक्षाला माहेराहून दुकान घेण्यासाठी सहा लाख रूपये आणण्याची मागणी केली. तिने नकार दिल्यानंतर तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. या छळाला कंटाळून सुरक्षाने गुरूवारी घरात ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. तपास निगडी पोलीस करत आहेत.