1 नव्हे 2 नव्हे तर ‘या’ पध्दतीनं केली तब्बल 15 लग्न, पुण्यातील ‘लखोबा’ नाशिकमध्ये जाळ्यात

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – पंधरा महिलांशी लग्न करणाऱ्या एका लखोबाला पोलिसांनी अटक केली आहे. विवाह विषयक संकेतस्थावरून घटस्फोटीत महिला, विधवा आणि इच्छुक महिलांना लग्नाचे आमिष दाखवत पैसे उकळून फसवणूक करत होता. या लखोबाला पीडित महिलांच्या मदतीने पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. संपत दरवडे असे या लखोबाचे नाव आहे.

संपत हा मुळचा नगर जिल्ह्यातील तळवाडे गावातीचा रहिवाशी असून सध्या तो पुण्यातील हडपसर परिसरात रहात होता. महिलांना लग्नाचे आमिष दाखवू तो त्यांची फसवणूक करायचा. घटस्फोटीत महिलांचा शोध घेण्यासाठी त्याने संकेतस्थळावर आपले आकाऊंट उघडले होते. नाशिकमध्ये अशाच एका महिलेला भेटण्यासाठी तो आला होता. त्याचवेळी पोलिसांनी पीडित महिलांच्या मदतीने सापळा रचून त्याला अटक केली. सध्या त्याची रवानगी पोलीस कोठडीत झाली आहे.

संपत याची 2015 मध्ये पुण्यात काम करणाऱ्या एका घटस्फोटित महिलेशी ओळख झाली. त्यांच्यामध्ये जवळीक वाढल्यानंतर लग्न केल्यास आर्थिक मदत देण्याचे सांगून महिलकडून 50 हजार रुपये उकळले. अशाच पद्धतीने पैसे उकळण्याची युक्ती त्याला सापडली आणि त्याने महिलांची फसवणूक करण्याचा उद्योग सुरु केला.

पोलिसांनी महिलांची फसवणूक करणाऱ्या संपत दरवडे याच्या मुसक्या आवळल्या असल्या तरी महिलांनी विवाह विषय माहिती भरताना आणि त्यावर संवाद करताना काळजी घेण्याची गरज आहे, असे पोलिसांनी सांगितले.

Visit : Policenama.com