पतीच्या गैरहजेरीत पत्नीनं प्रियकराला घरी बोलावलं, शेजाऱ्यांना लागली ‘भनक’ अन् पुढं ‘असं’ झालं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बिहारमध्ये ‘मॉब लिंचिंग’च्या घटना वाढतच आहेत. गर्दीला सोबत घेऊन न्यायनिवाडा करण्याचे काम सुरु आहे. नुकत्याच किशनगंज या ठिकाणी घडलेल्या एका घटनेमध्ये लोकांनी एकत्र येऊन कायदा हातात घेत अनैतिक संबंध ठेवणाऱ्या एका विवाहित महिलेला आणि प्रियकराला चांगलाच चोप दिला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बँकेच्या कर्जासंबंधीच्या माहितीसाठी एक विवाहित महिला बँक कर्मचाऱ्याला भेटत होती, याच दरम्यान दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. महिलेला दोन लहान मुले आहेत आणि तीचा पती ई – रिक्षा चालवत असे ज्यामुळे कधी कधी रात्री घरी येणे त्याला शक्य होत नसे. मंगळवारी पती घरी येत नसल्याचे जमजताच त्या महिलेने आपल्या प्रियकराला घरी बोलावले.

या सगळ्या कृत्याची खबर शेजाऱ्यांना लागली. त्यांनी त्या महिलेच्या पतीला फोन करून सांगितले. तिचा पती तातडीने घरी आला व महिलेला दरवाजा उघडण्यास सांगू लागला. मात्र त्या महिलेने दरवाजा उघडण्यास नकार दिल्यामुळे त्याने आजूबाजूच्या लोकांची मदत घेत दरवाजा तोडला आणि पत्नीला आणि प्रियकराला रंगे हाथ पकडले.

रागाच्याभरात जमलेल्या जमावाने सदर महिलेला आणि तिच्या प्रियकराला चांगलाच चोप दिला. त्यानंतर दोघांनाही पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले, तेव्हा पोलिसांना दिलेल्या माहितीत हे दोघे तब्बल १ वर्षांपासून सोबत असल्याचे स्पष्ट झाले. पुढील तपास किशनगंजचे स्थानिक पोलीस करत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –

 

You might also like