सांगलीत ‘ऑनर किलिंग’ ; प्रेमविवाह केल्याच्या रागातून तरुणीचा निर्घृण खून

पलूस (सांगली) : पोलीसनामा ऑनलाइन – प्रेमविवाह केल्याच्या रागातून नवविवाहितेचा खून केल्याचा प्रकार पलूस तालुक्यातील सांडगेवाडी येथे घडला. याप्रकरणी पोलिसांनी वडील आणि भावाला ताब्यात घेतले आहे. पूजा रवींद्र आवळे (वय-१९) असे खून झालेल्या नवविवाहीतेचे नाव असून वडील आणि भावानेच खून केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

नामदेव बापू सोने (वय-५७) आणि रोहित बापू सोने (वय-२८) असे ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहेत. शनिवारी सायंकाळी दोघांनी पूजाच्या सासरी जाऊन तिचा लोखंडी गजाने मारहाण करून खून केला. पोलिसांनी गुन्ह्याचा तपास करून २४ तासाच्या आत आरोपींना गजाआड केले.

मयत पूजा हिचे तिच्याच गल्लीत राहणाऱ्या रविंद्र आवळे याच्यासोबत प्रेमसंबंध होते. त्यांचे प्रेमप्रकरण घरच्यांना समजल्यावर घरच्यांनी हे संबंध तोडावेत यासाठी प्रयत्न केले. यासाठी त्यांनी अनेकवेळा बैठका घेऊन त्यांना प्रेमसंबंध तोडण्यास सांगितले. बैठकीदरम्यान पूजाचा भाऊ रोहित याने ‘लग्न केल्यास तूला चाकूने भोकसून मारेन’ अशी धमकी दिली होती. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता त्यांनी खुनाची कबुली दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले. पुढील तपास पलुस पोलीस करीत आहेत.

लठ्ठपणाचा रोगप्रतिकारक शक्तीवर होतो परिणाम, काळजी घेणे गरजेचे

‘या’ घरगुती उपयांनी करा चेहरा मॉइश्चरायईज

‘नाईट शिफ्ट’मध्ये काम करत आहात, मग ‘हे’ पदार्थ अवश्य खा

जाणून घ्या आरोग्यवर्धक ‘जवसाचे’ फायदे

नोकरी शिक्षणानंतर आता स्थानिक निवडणुकांत मराठा आरक्षण ?