पतीला ‘डिच’ देऊन ‘लव्हर’शी केलं लग्न, चक्क मुख्यमंत्र्यांनी ‘हजेरी’ लावली समारंभाला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मुख्यमंत्री सामूहिक विवाह योजनेत उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत एका विवाहित महिलेने विवाह अनुदानाच्या लोभाने आपल्या पतीचा विश्वासघात करून आपल्या प्रियकराशी लग्न केले. पहिल्या पतीच्या आईने अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असता संबंधित प्रकरण समोर आले. ही बाब उघडकीस आल्यानंतर एडीओ पंचायत कल्याणपूर ब्रिजेश कुमार यांना त्वरित पदभार काढून मुख्यालयाशी संलग्न केले. सीडीओ ने याप्रकरणी एफआयआरचे आदेश दिले आहेत.

मुख्यमंत्री सामूहिक विवाह योजनेंतर्गत, १४ नोव्हेंबर रोजी बिलसंडा ब्लॉकमध्ये ५२५ जोडप्यांचा सामूहिक विवाह करण्यात आला. त्यात स्वत: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे विवाहित जोडप्यांना आशीर्वाद देण्यासाठी गावात आले होते. सुशीला देवी नावाच्या महिलेनेही सामूहिक विवाहात प्रेयसीबरोबर सात फेऱ्या मारल्या.

पीलीभीत येथील सिव्हिल लाइन्स निवासी असलेल्या मोहितसोबत या महिलेचे पहिले लग्न झाले आहे. या महिलेची आधीची सासू शांती देवी यांनी अधिकाऱ्यांकडे तक्रार केली की सामूहिक विवाहात भाग घेणारी सुशीला देवी यांनी सहा महिन्यांपूर्वी आपल्या मुलाबरोबर लग्न केले होते. तिने मुलाचा विश्वासघात करून प्रियकराशी लग्न केले. लग्नासाठी नाव, पत्ता आणि इतर नोंदी तिने आपल्या मुलाच्या नावाने लावलेली होती.
त्या महिलेच्या आधीच्या सासूने सांगितले की काही दिवसांपूर्वी तिच्या सुनेला तिच्या माहेरवाल्यांनी घरी नेले होते. तेथून ती सामूहिक विवाहात सामील झाली.

५१ हजार रुपये घेण्याच्या उद्देशाने मुलाचा विश्वासघात केला. १४ नोव्हेंबरला मुख्यमंत्री योगी नूरपूर गावात व्यासपीठावरून भाषण देत होते तर दुसरीकडे ५२५ जोडपी मंदिराजवळ विवाहबद्ध होत होते. मुख्यमंत्र्यांनी वधू-वरांना एकत्रितपणे आशीर्वाद देखील दिला. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामूहिक विवाहातील फसवणूकीच्या प्रकरणानंतर अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली. डीएमने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले असून बीडीओ लिलौरीखेडा यांच्याकडे तपासासाठी हे प्रकरण सोपविण्यात आले आहे.

Visit : Policenama.com