सासरच्या मंडळीकडून तिचा व्हायचा नेहमीच ‘छळ’, लिपस्टिकनं भितींवर लिहून काढली ‘सुसाइड’ची ‘कळ’

हरयाणा/करनाल : वृत्तसंस्था – भिंतीवर लिपस्टिकने सुसाइड नोट लिहून विवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना हरयाणामधील करनाल जिल्ह्यात उघडकीस आली आहे. सासरच्या लोकांनीच तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप मयत महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे. पोलिसांनी महिलेने लिहलेल्या सुसाईड नोटवरून तपास सुरु केला आहे.

विवाहितेने आत्महत्या केल्याची माहिती तिच्या घराजवळ राहणाऱ्या शेजाऱ्यांनी नातेवाईकांना दिली. दरम्यान पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तपासी अधिकाऱ्यांनी सांगितले की, मृत महिलेने आत्महत्येपूर्वी भिंतीवर सुसाईटन नोट सारखे काही लिहले आहे. त्याच आधारे याचा तपास सुरु आहे.

प्लॉट खरेदी करण्यासाठी माहेराहून पैसे आणावेत यासाठी सासरच्या लोकांकडून तिचा छळ करण्यात येत होता. तिला मानसीक आणि शारिरीक त्रास दिला जात होता असा आरोपी मृत महिलेच्या आईने केला आहे. तसेच तीन वर्षापूर्वी तिचा विवाह झाल्यानंतर तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यावेळी तिला वाचवण्यात आले होते, असेही नातेवाईंकांनी सांगितले.

सासरच्या लोकांकडून तिचा नेहमी छळ करण्यात येत होता. प्लॉट खरेदी करण्यासाठी पैसे आणावेत यासाठी तिला त्रास देत होते. तिला नोकरांसारखी वागणूक दिली जात होती. तिला नेहमीच मारहाण करण्यात येत होती. सततच्या होणाऱ्या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचे नातेवाईकांनी पोलिसांना सांगितले. दरम्यान, मृत महिलेने लिहलेल्या सुसाइड नोट आणि नातेवाईकांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/