टेंभुर्णी येथे ‘सत्यशोधक’ विवाह संपन्न

इंदापूर (सुधाकर बोराटे) : पोलीसनामा ऑनलाईन – निर्मिकाचा धर्म सत्य आहे. एक आहे, मग अनेक भांडणे कशासाठी.? हा सत्यशोधक विचार क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले यांनी १८ व्या शतकात मांडला होता. याच विचारांची प्रेरणा घेवुन मौजे हिंगणगाव ता. इंदापूर येथिल प्रा.सचिन आरडे व वालचंदनगर येथिल श्रेया देशमुख या शिक्षित नव वधू- वरांनी आजच्या कलयुगातील १९ व्या शतकामध्ये रविवार दिनांक ११ आॅगष्ट २०१९ रोजी अनावश्यक खर्चाला फाटा देवुन सत्यशोधक पद्धतीने विवाह केला.

विवाहामध्ये अनावश्यक खर्चाला फाटा देवुन सत्यशोधक पद्धतीने विवाह लावण्यात आला. यावेळी विवाहात वैदिक पद्धतीऐवजी सत्यशोधक पद्धतीने अक्षदा म्हणून तांदुळ या ऐवजी फुलांचा वापर करण्यात आल्याने या नवदांपत्याचे सर्वच स्तरातुन कौतुक होत आहे.

सत्यशोधक विवाहामध्ये सर्वप्रथम महापुरुषांच्या प्रतिमेला वधु- वराचे पालक व वधू- वर यांनी पूष्पहार अर्पन केले. त्यानंतर सर्व महापूरूषांच्या प्रतिमेला वंदन करून, वधू – वर यांचे मामा, मामी यांचे हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर सत्यशोधक रमेश शिंदे यांनी मंगल अष्टकांचे गायन केले व सत्यशोधक विवाह सोहळा संपन्न झाला. विवाहानंतर सागर शिंदे यांनी वधु-वरास भारतीय संविधानावर हात ठेवून सर्व उपस्थितासमोर शपथ दिली.

या सत्यशोधक विवाहास विद्या प्रतिष्ठान सुपे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राहुल पाटील, रत्नदीप लोखंडे, साहेबराव चव्हाण, आबा शिंदे, युवराज वजाळे, प्रा.धनंजय भोसले, राजेंद्र गस्ते, विवेक बाबर, जयपाल सदामते, शरद यादव, आनंद जगताप, विजय देवकर, रुपेश सोनवणे, राहुल सोनवणे, अख्तर पठाण, विशाल लोंढे, कुमार साठे, रोहित धेंडे, वैशाली मासाळ, भाग्यवंत आरडे, अक्षय शिंदे, पंकज दराडे, मारुती राऊत, सागर कांबळे, रवी पांढरे,राहुल आरडे, अमोल आरडे, संतोष गायकवाड, संतोष आरडे, उमेश मखरे व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आरोग्यविषयक वृत्त –