Coronavirus Impact : ‘कोरोना’मुळं जगातील ‘या’ मोठ्या कंपनीनं तब्बल 10 हजार कर्मचार्‍यांना ‘बिनपगारी’ पाठवलं सुट्टीवर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगातील सर्वात मोठी हॉटेल चेन असलेल्या मॅरियट इंटरनॅशनलने आपल्या कर्मचाऱ्यांना सुट्टीवर पाठवले आहे. या सुट्ट्या पगाराविना आहेत. म्हणजे कर्मचाऱ्यांना सुट्ट्यांचा पगार मिळणार नाही. कोरोना महामारीमुळे लोकांनी प्रवास बंद केला आहे याचा फटका म्हणून हॉटेल व्यवसाय ठप्प होत आहेत. त्यामुळे मेरियटने आपल्या जवळपास सर्वच कर्मचाऱ्यांना सुट्टीवर पाठवले आहे. तसेच कंपनीने आपले काही हॉटेल बंद करण्यास सुरुवात केली आहे.

मॅरियटकडून सांगण्यात आले की, त्यांचा व्यवसाय कोरोनामुळे ठप्प झाला आहे. मागणी नसल्याने त्यांच्या व्यवसायात घट होत आहे. मॅरियटच्या प्रवक्त्याने सांगितले, आम्ही आमचे सहयोगी, पाहूणे, मालक यांच्या मदतीवर लक्ष ठेवून व्यवसायावरील परिणाम कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहोत.

गो एअरने देखील दिल्या सुट्ट्या –
कोरोना व्हायरसमुळे खबरदारी घेत गो एअरने मंगळवारपासून आपली आंतरराष्ट्रीय उड्डाने रद्द केल्याची घोषणा केली. उड्डाणे कमी झाल्याने त्यांनी आपल्या कर्माचाऱ्यांना बिना वेतनाचे सुट्टीवर पाठवले. कंपनी काही अंशी कर्मचाऱ्यांच्या वेतनात 20 टक्क्यांनी कपात करण्याची योजना आखत आहे. कंपनीने सांगितले की कोरोना व्हायरसच्या संकटाचा सर्वात जास्त फटका विमान उद्योगांना बसत आहे. कारण सरकारकडून प्रवासावर प्रतिबंध आणण्यात आले आहेत.