कोण आहे ही…जिला सलमान खानच पती हवा आहे….या वेडे पणाला काय म्हणावे ?

जळगाव : पोलीसनामा ऑनलाईन – सुप्रसिद्ध अभिनेता सलमान खान यांच्या प्रेमात लाखो मुली आहे. तो कोणाशी लग्न करेल याची उत्सुकता त्याच्या चाहत्यांना खुप आहे. त्याच्या आयुष्यात अनेक अभिनेत्री आल्या आणि गेल्या पण तो जोडीदार म्हणून कोणाला निवडेल. याची वाट सर्व जण पाहत आहे. प्रत्येक मुलीला वाटत असते की सलमान सारखा जोडीदार आपल्या ही आयुष्यात यावा. पण चक्क सलमान खान च आपला जोडीदार असवा असे कोणाला वाटते का ? या शिक्षिकेला वाटते. कोण आहे ही जिला सलमानच जोडीदार हवा जाणून घेऊया….

जळगावमधील एमआयडीसी पोसील स्टेशनच्या हद्दीत राहणारी ३५ वर्षाची ही शिक्षिका ती चक्क सुप्रसिद्ध अभिनेता सलमान खानच्या प्रेमात पडली आहे. आणि एवढेच नव्हे तर तिला त्याच्याशी लग्न करायचे आहे. त्यासाठी तिने पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहले आहे. व त्याचबरोबर पोलिसांना देखिल १२ पानांचे पत्र लिहले आहे. या सर्व प्रकारणाची चौकशी केली असता.

पंतप्रधान मोदी व पोलीसांना लिहलेल्या पत्रामध्ये तिने सांगितले, मला कोणी नाही. मला जोडीदार हवा आहे. आणि तो ही सलमान खानच.. मला त्याच्याशी लग्न करायचे आहे. हीच इच्छा सलमान खानची देखिल आहे. त्यामुळे मला त्याच्याशीच लग्न करायचे आहे. याशिवाय त्या शिक्षिकाने १२ पानांचे स्वतंत्र अर्जातही संसार त्याचबरोबर राजकारण, समाजकारण यावर भाष्य देखिल केले आहे.

या शिक्षिकेच्या वेडेपणाचा त्रास पोलिसांना होत आहे. नक्की हिचे काय चालु आहे. याचा प्रश्न पोलिसांना पडला आहे. शिक्षिकेच्या या विचित्र मागणीला काय म्हणावे ? हिने १२ डिसेंबर रोजी हे अर्ज व पत्र दिलेली होती. गुरुवारी हे अर्ज निकाली काढण्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.