आज अवकाशात दिसेल एक ‘अद्भुत’ दृश्य, ‘मंगळ ग्रह’ असेल पृथ्वीच्या अगदी जवळ

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : मंगळवारी म्हणजेच आज एक महत्वाची खगोलशास्त्रीय घटना घडेल आणि सौर यंत्रणेत एक अद्भुत दृश्य दिसेल. मंगळ ग्रह पृथ्वीच्या सर्वात जवळ असेल आणि त्याच्या तेजस्वी नारिंगी रंगात तो चमकताना दिसेल. ज्योतिष संशोधक आणि अ‍ॅस्ट्रोलॉजी एक विज्ञान रिसर्च पुस्तकाचे लेखक गुरमीत बेदी म्हणाले की आश्चर्यकारक गोष्ट ही असेल की या दिवशी मंगळ सूर्याच्या विरुद्ध असेल आणि पृथ्वी थेट मंगळ व सूर्याच्या दरम्यान स्थित असेल.

यामुळे पृथ्वी आणि सूर्यासह मंगळ ग्रह एका सरळ रेषेत दिसतील. गुरमीत बेदी यांच्या म्हणण्यानुसार, जे लोक यावेळेस या खगोलीय घटनेस आणि सौर यंत्रणेतील या अद्भुत दृश्याला पाहण्यास मुकतील त्यांना नंतर आणखी 15 वर्षे वाट पाहावी लागेल आणि असे दृश्य 11 सप्टेंबर 2035 रोजीच पाहायला मिळेल. मंगळवारी आपण आपल्या डोळ्यांनी देखील मंगळ ग्रहाला पाहू शकाल. गुरमीत बेदी म्हणाले की, सर्वात नेत्रदीपक आणि आश्चर्यकारक दृश्य असेही असेल की मंगळवारी संध्याकाळी जेव्हा पश्चिमेकडे सूर्य मावळत असेल तेव्हा पूर्वेला मंगळ उगवत असेल.

गुरमीत बेदी यांच्या मते, विज्ञानाच्या भाषेत या खगोलशास्त्रीय घटनेला मार्स अ‍ॅट अपोझिशन (Mars at Opposition) म्हटले जाते. सूर्य, पृथ्वी आणि मंगळ या तिन्ही ग्रहांचे एकाच वेळी सरळ रेषेत येणे हा खगोलशास्त्रात रस असणाऱ्यांसाठी खरोखर एक अविस्मरणीय क्षण असेल. मध्यरात्रीपर्यंत मंगळ दक्षिणेकडे सरकेल आणि जर आपल्याकडे एक उच्च दर्जाची दुर्बिण असल्यास आपणास या ग्रहाच्या पृष्ठभागाची एक झलक देखील मिळू शकेल.