‘मंगळ’ ग्रहावर मिळाला ‘ऑक्सीजन’ गॅस, ‘NASA’ च्या वैज्ञानिकांना मोठं ‘यश’

नवी दिल्ली :वृत्तसंस्था – अमेरिकेची अंतराळ संस्था नासाने मंगळावर ऑक्सिजन असल्याचा शोध लावला आहे. नासाने मंगळावर पाठवलेल्या क्यूरियोसिटी रोवर याने हा शोध लावला असून 6 ऑगस्ट 2012 रोजी हा रोव्हर मंगळावर लँड झाला होता. आतापर्यंत मंगळावर या रोव्हरने 20 किलोमीटर प्रवास केला असून सध्या तो गेल क्रेटरमध्ये आहे.

क्यूरियोसिटीवर असलेल्या लॅबने लावला शोध
क्यूरियोसिटी रोव्हरचा आकार झीप मोठा असून जवळपास 10 फूट लांब आणि 9 फूट रुंद असून 7 फूट उंच आहे. यामध्ये एक प्रयोगशाळा देखील असून यामध्ये आतापर्यंत मातीचे 70 सॅम्पल तपासण्यात आले आहेत. याच प्रयोगशाळेत या गॅसचा देखील शोध लावण्यात आला आहे.

किती मात्रा आहे या गॅसची
क्यूरियोसिटी रोव्हरने केलेल्या तपासात आढळून आले आहे कि, मंगळावर 95% कार्बन डायऑक्साइड, 2.6% नाइट्रोजन, 1.9% आर्गन, 0.16% ऑक्सीजन आणि 0.06% कार्बन मोनोऑक्साइड आहे.

मंगळावर किती आहे ऑक्सिजनची मात्रा
2012 ते 2017 यादरम्यान या रोव्हरने मंगळावर गॅसचे निरीक्षण केले असून मंगळवार वसंत ऋतूत आणि उन्हाळ्यात ऑक्सिजनचे प्रमाण जास्त आढळून आले आहे.

भारतीय वैज्ञानिक देखील सहभागी
मिशिगन यूनिवर्सटीच्या क्लायमेट आणि स्पेस सायन्सचे प्रोफेसर सुशील अत्रेय हेदेखील क्यूरियोसिटी मिशनबरोबर असून आम्ही देखील सुरुवातीला हि माहिती मिळाल्यानंतर हैराण झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.

काय राहणार मंगळावर ऑक्सिजन
प्रोफेसर सुशील अत्रेय यांनी सांगितले कि, वैज्ञानिक यावर शोध घेत असून अधिक चांगल्या परिणामांसाठी शोध सुरु आहे.

Visit : Policenama.com