मंगळ ग्रहाचं ‘वक्र’ मार्गक्रमण ! आगामी 66 दिवस कोणत्या राशीची कशी ‘स्थिती’, जाणून घ्या कुणासाठी ‘मंगलकारी’

पोलीसनामा ऑनलाइन – नवग्रहांचे सेनापती मंगळ 10 सप्टेंबरपासून स्वत:ची राशी मेषमध्ये वक्री म्हणजे उलट मार्गक्रमण करणार आहे. या राशीत मंगळ 4 ऑक्टोबरपासून वक्री असेल आणि मीन राशीत पोहचून 3 नोव्हेंबरपर्यंत वक्री राहील. यादरम्यान पहिल्या टप्प्यात 4 ऑक्टोबरपर्यंत मंगळाचा हा संचार कोणकोणत्या राशींसाठी समस्या निर्माण करेल आणि त्रासदायक असेल आणि कोणत्या राशींसाठी शुभस्थिती निर्माण करेल, ते जाणून घेवूयात…

मेष
मंगळ आपला राशीस्वामी आहे आणि आपल्याच राशीत वक्री असणार आहे. मंगळ आपल्याच राशीत लग्न भावातून म्हणजे पहिल्या घरातून मार्गस्थ होईल. या वेळी आपला आत्मविश्वास कमी होऊ शकतो. उर्जादेखील प्रभावित होऊ शकते. वर्कलोड वाढेल. या वेळी थकवा जाणवेल. या टप्प्यात एखाद्या वादात अडकू शकता.

वृषभ
मंगळ आपल्या राशीच्या 12 व्या घरात गोचर करेल. हे स्थान खर्चाचे म्हणून ओळखले जाते. यामुळे आपला खर्च मोठ्या प्रमाणात वाढू शकतो. चांगली गोष्ट म्हणजे एखाद्या गुंतवणूकीबद्दल विचार करत असाल तर या वेळी शांत व्हावे. भागीदारीची कामे टाळली पाहिजेत. आरोग्याच्या बाबतीत थोडी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

मिथुन
आपल्या राशीच्या 11 व्या घरात मंगळ गोचर करत आहे. हे स्थान कर्माचे स्थान म्हणून ओळखले जाते. याकाळात अनेक फायदे मिळणार आहेत. प्रयत्न यशस्वी होतील. सभोवतालचे वातावरणही आनंदी असेल. प्रिय व्यक्तीबरोबर रोमान्स अनुभवू शकता आणि आपले नाते घट्ट होईल.

कर्क
मंगळ मेष राशीत वक्री होताना 10 व्या स्थानातून मार्गक्रमण करेल. हे स्थान पितृचे म्हणून ओळखले जाते. त्याच्या परिणामामुळे, आपण या दरम्यान काही चांगले व्यवसाय, सौदे करू शकता. मागील गुंतवणूकींमधूनही तुम्हाला फायदा होईल. या वेळी आपले आरोग्य देखील उत्कृष्ट राहील आणि कुटुंबात आनंद राहील.

सिंह
मेष राशीत वक्री चाल करत मंगळ 9 व्या घरातून मार्गक्रमण करेल. याचा परिणाम म्हणून, आपली प्रगती थोडी हळू होईल. फायदा होत राहील. परंतु यावेळी आपल्याला बदल किंवा स्थानांतराला देखील सामोरे जावे लागेल. परदेशातील संधी शोधत असलेल्या लोकांना यावेळी फायदा होऊ शकतो. विद्यार्थी यशस्वी होण्याची शक्यता आहे.

कन्या
मंगळ मेष राशीत वक्री असताना राशीच्या 8 व्या स्थानातून मार्गक्रमण करेल. हे स्थान आर्थिक समस्या दर्शवते. यावेळी, आपण कोणताही महत्त्वपूर्ण निर्णय घेणे टाळावे. वारसाच्या बाबतीत किंवा जमीन मालमत्तेच्या बाबतीत वाद होऊ शकतात. यावेळी दुखापती व अपघातांपासूनसुद्धा काळजी घेणे आवश्यक आहे.

तुळ
मंगळ तुमच्या राशीच्या 7 व्या स्थानातून मार्गक्रमण करेल. हे स्थान विवाहित जीवन प्रतिबिंबित करते. या काळात घरातील कार्यात शांतता आणि संयम दाखवत कार्य केले पाहिजे. या काळात आपली प्रगती देखील कमी होऊ शकते आणि चिंता वाढू शकते.

वृश्चिक
आपल्या स्वतःच्या राशीत मंगळ सहाव्या घरातून वक्री मार्गक्रमण करत आहे. याचा परिणाम म्हणजे सोयीच्या गोष्टी वाढवाल. लक्झरी वस्तू खरेदी कराल. दररोज व्यायामावर आणि योगाकडे लक्ष देणे आवश्यक आहे. तुमचे आरोग्य चांगले राहील.

धनु
मंगळ आपल्या राशीच्या पाचव्या घरातून वक्री मार्गक्रमण करत आहे. याचा परिणाम म्हणून तुम्हाला नोकरी आणि व्यवसायाच्या बाबतीत काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. यावेळी आपण आपल्या वरिष्ठांशी वाद घालू शकता आणि त्याबद्दल वाईट वाटेल. नवीन व्यवसाय करणे टाळा. कौटुंबिक प्रकरणात संयम बाळगण्याची गरज आहे.

मकर
एक उग्र ग्रह मानला जाणारा मंगळ आपला शत्रू शनिच्या राशीत मकरच्या चौथ्या घरात गोचर करत आहे. या परिणामामुळे, कार्यक्षेत्रात खुप व्यस्त असाल आणि यावेळी आपल्याला नवीन जबाबदारी मिळू शकतात. नवा प्रकल्प सुरू करण्याचा विचार करू शकता. आईच्या आरोग्याबाबत काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

कुंभ
वक्री असलेला अग्नी तत्वाचा ग्रह मंगळ तुमच्या राशीच्या तिसर्‍या घरातून मार्गक्रमण करेल. याचा परिणामा म्हणजे आपण काही चांगल्या सौद्यांमध्ये स्वाक्षरी करू शकता. पूर्वीची गुंतवणूक तुम्हाला यावेळी लाभ देईल आणि पैशाच्या बाबतीत तुमची स्थिती मजबूत होईल. तुमचा आत्मविश्वास वाढेल.

मीन
मंगळ द्वितीय घरात आपल्या राशीतून मार्गक्रमण करेल. परिणामस्वरूप, आपल्याला आगामी काळात काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. पैशाशी संबंधित प्रकरणांमध्ये काही प्रकारचे नुकसान देखील सहन करावे लागू शकते. घरात पत्नीशी बोलताना जरा सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. संयम बाळगला पाहिजे.