आज ‘मंगळ’ करणार ‘कन्या’ राशीत ‘प्रवेश’, जाणून घ्या तुमच्या ‘राशी’वर काय होणार ‘परिणाम’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ‘मंगळ’ने 25 सप्टेंबरला सकाळी 6 वाजून 31 मिनिटांनी कन्या राशीत प्रवेश केला आहे. जेथे विराजमान असलेल्या सूर्य, बुध आणि शुक्रबरोबर युतीत असेल. त्यानंंतर 10 नोव्हेंबरपर्यंत मंगळ कन्या राशीत असेल. मंगळ मेष आणि वृश्चिक राशीचा स्वामी असतो. कुंडलीत मंगळ पराक्रम आणि नेतृत्व प्रधान क्षमतेचे प्रतिक मानला जातो. जर तुमच्या राशीत मंगळ शुभ प्रभावी असेल तर जीवनात येणाऱ्या समस्या कमी होतील. याचा 12 राशींवर देखील परिणाम होईल.

मेष रास –
मंगळचे जाणे तुम्हाला शूत्रापासून मुक्ती मिळेल. आधिक खर्च होईल. न्यायालयीन प्रकरणी आलेले निर्णय तुम्हाला अनुकूल असेल. आरोग्याची काळजी घ्या.

वृषभ रास –
मंगळाचा प्रवेश शिक्षण आणि स्पर्धेत यश मिळवून देईल. मुलांसंबंधित काळजी लागून राहिल, प्रेम संबंधित प्रकरणात निराशा येईल. सावध रहा आणि कार्य करा.

मिथून रास –
मंगळ जाण्याने मानसिक अशांति येईल. काही कौटूंबिक कलहाचा सामना करावा लागेल. मित्रांशी चांगले संबंध ठेवा. घर, वाहन खरेदीचा योग आहे.

कर्क रास –
मंगळ साहसी आणि पराक्रमी बनवेल. तुमच्याकडून घेतलेले निर्णयाचा आणि कार्याची स्तुती होईल. रागावर नियंत्रण ठेवा, कुटूंबात मतभेद होतील.

सिंह रास –
मंगळ जाण्याचा चांगले फळ मिळेल कारण राशीत मंगळ योग कारक आहे. महागड्या वस्तूची खरेदी करु शकतात. डोळ्याची काळजी घ्या.

कन्या रास –
मंगळ ग्रहांचे इतर ग्रहांबरोबर असणे लाभकारक ठरेल. परंतू धैर्याने काम घ्यावे लागेल.

तुळ रास –
प्रवासाचा योग आहे. वाहन चालवताना सावध रहा. वाद विवादांपासून पासून दूर रहा.

वृश्चिक रास –
मंगळ तुमच्या राशीतून जाणे तुमच्यासाठी उत्पन्नात वाढ करुन देणारे ठरेल. एखादे महत्वाचे काम पूर्ण होईल. तुमच्यासाठी वेळ अनुकूल आहे, लाभ घ्या.

धनू रास –
मंगळचे राशीतून जाण्याने पद आणि सन्मान वाढेल. विदेशी कंपनीबरोबर व्यवसाय केल्यास लाभकारक ठरेल.

मकर रास –
भाग्यातून मंगळचे जाणे धार्मिक कार्याप्रती तुमची जागरुकता वाढवेल. तीर्थयात्रा आणि देशप्रवासाचा लाभ मिळेल. समाजात प्रतिष्ठा वाढेल.

कुंभ रास –
मंगळ तुमच्या आरोग्यावर विपरित परिणाम करेल. उच्चाधिकार्यांबरोबर चांगले संबंध ठेवा. षड्यंत्राचे शिकारण होण्यापासून वाचा, आई वडीलांच्या आरोग्याची काळजी घ्या.

मीन रास –
मंगळामुळे दांपत्य जीवनात वाद होतील. याकडे दूर्लक्ष करु नका. व्यवसायाच्या दृष्टीने वेळ चांगले बदल होत जातील. शिक्षणात अवश्य यश मिळेल.

Visit : policenama.com