खुशखबर ! PNB बँकेच्या बचत ठेवींवर मिळणार आकर्षक व्याजदर, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – आजकाल सर्व बँका कायम ठेवीवरील रकमेवरचा व्याजदर कमी करत आहेत. त्यात भारतीय रिजर्व बँकेने रेपो रेट कमी केल्यानंतर सगळ्या बँका एफडी वर मिळणारे व्याज दार कमी करू लागल्या आहेत. मात्र पंजाब नॅशनल बँकेने आपल्या कायम ठेवी (FIXED DEPOSIT) वरील व्याजदरांच्या बाबतीत मोठे बदल केले आहेत.

नवीन बदल आज (१ सप्टेंबर) पासून लागू केले जाणार आहेत. पंजाब नॅशनल बँकेने २ करोड रुपयांपेक्षा कमी एफडी वर व्याज दर ०.५० टक्यांनी कमी केले आहे. तसेच पीएनबी २ करोड रुपयांपेक्षा कमी कायम ठेवीवर ७ ते १४ दिवस आणि १५ ते २९ दिवसांच्या मॅच्युरिटी वर ४.५% आणि ५.५ टक्के व्याज ऑफर करत आहे. तसेच जेष्ठ नागरिकांना सामान्य नागरिकांपेक्षा अर्धा टक्का जास्त देणार आहे. याच्या आधी बचत ठेवीवर व्याज दर हे ५% ते ५.५०% होते.

जाणून घ्या , असे असतील पीएनबी चे नवीन FD रेट (२ करोड़ रुपयांपेक्षा कमी)
– ७ ते १४ दिवस – ४.५० %
– १५ ते २९ दिवस – ४.५०%
– ३० ते ४५ दिवस – ४. ५०%
– ४६ ते ९० दिवस – ५.५०%
– ९१ दिवस ते १७९ दिवस – ५.५०%
– १८० दिवस ते २७० दिवस – ६.००%
– २७१ दिवस ते १ वर्षापेक्षा कमी – ६.२५%
– ३३३ दिवस – ६.३०%
– १ वर्ष ते ५५५ दिवस – ६.६०%
– १ वर्ष ते ५५५ दिवस -६.६०%
– १ वर्षापेक्षा जास्त आणि ३ वर्षापेक्षा कमी – ६.५०%
– ३ वर्षापेक्षा जास्त आणि ५ वर्षापेक्षा कमी – ६.५०%
– ५ वर्षांपेक्षा जास्त ते १० वर्षापेक्षा कमी – ६.५०%

पीएनबी सोबत, ओबीसी आणि युनायटेड बँकेचे होणार विलीनीकरण
केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारमन यांनी शुक्रवारी पीएनबी (Punjab National Bank ) सोबत, ओबीसी (Oriental Bank of Commerce) आणि युनायटेड बँक (United Bank of India ) चे विलीनीकरण होणार असल्याचे जाहीर केले होते. या विलीनीकरणाच्या प्रक्रियेनंतर पंजाब नॅशनल बँक हि देशातील दुसऱ्या क्रमांकाची बँक होईल. तिन्ही बँकांची मिळून एक बँक होणाऱ्या बँकेच्या देशभरात ११,४३७ शाखा होतील. तसेच देशात आता १२ सरकारी बँका राहतील. याच्या आधी २०१७ मध्ये सार्वजनिक क्षेत्रात २७ बँका होत्या.

आरोग्यविषयक वृत्त –