IND vs NZ : टी-२० सुरु होण्याआधीच न्यूझीलंडला धक्का 

वेलिंग्टन : वृत्तसंस्था – भारत विरुद्ध न्यूझीलंड एकदिवसीय मालिका संपली आहे. तर दोन्ही संघ आता टी-२०च्या मालिकेसाठी सज्ज झाले आहेत. ही मालिका सुरु होण्याआधीच न्यूझीलंडला मोठा धक्का बसला आहे. न्यूझीलंडचा धडाकेबाज सलामीवीर मार्टिन गप्टिल हा संघातून बाहेर झाला आहे.

टी-20 मालिकेत मार्टिन गप्टील खेळू शकणार नाही. कारण तो अद्याप पूर्णपणे बरा झाला नाही. गप्टिल संघाचा महत्त्वाचा भाग आहे. मात्र, त्याला विश्रांती देऊन पूर्ण बरा होण्याची वाट पाहावी लागेल, अशी माहिती न्यूझीलंड क्रिकेट संघाचे प्रशिक्षक गॅरी स्टीड यांनी दिली आहे.

गप्टिलच्या पाठीला दुखापत झाल्याने गप्टिलला विश्रांती देण्यात आली आहे. तर मार्टिल गप्टीलच्या जागेवर संघात ऑलराऊंडर जिमी निशाम याला संधी देण्यात आली आहे. पाच वन डे सामन्यांच्या मालिकेतील अंतिम दोन सामन्यात जिमी निशाम खेळला होता. भारताविरूद्धच्या पाचव्या एकदिवसीय सामन्याआधी गप्टिलला दुखापत झाली होती. आता गप्टिलला विश्रांती देण्यात आली आहे.

दरम्यान, भारत विरुद्ध न्यूझीलंड टी-२० मालिकेला सुरुवात होणार आहे. वेलिंग्टनमध्ये ६ फेब्रुवारी रोजी पहिला टी-२० सामना होईल, तर अंतिम सामना १० फेब्रुवारी रोजी होईल,

You might also like