चिमुकलीचा चेहरा पाहण्याआधीच जवान ‘शहीद’, 2 महिन्यापुर्वीच जन्मली होती ‘परी’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जम्मू-काश्मीरमध्ये आलेल्या हिम वादळात लष्कराचे तीन जवान शहीद झाले. त्यातील एक गुरदासपूरच्या सिद्धपूर नवा पिंडचे आहेत. ज्यांचे अवघ्या एका वर्षापूर्वी लग्न झाले होते, आणि नुकताच दोन महिन्यांपूर्वी एक मुलगी झाली होती, जिचा चेहरा न पाहता हा जवान देशाचा शहीद झाला. जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील माछिल-उरी सेक्टरमध्ये हा सैनिक शहीद झाला.

26 वर्षीय रणजितसिंग सलारिया 45 व्या राष्ट्रीय रायफल्समध्ये शिपाई होते. ते सध्या जम्मू-काश्मीरमध्ये तैनात होते. गेल्या वर्षी 26 जानेवारी 2019 रोजी रणजितचे लग्न झाले होते. घरात सर्वत्र आनंदाचे वातावरण होते. लग्नानंतर, शहीद रणजितसिंग आपल्या कर्तव्यावर रुजू झाला. डिसेंबरमध्ये त्यांच्या घरी एका गोंडस मुलीचा जन्म झाला. जिचे नाव परी ठेवण्यात आले. शहीद रणजितसिंग आपल्या मुलीचा हसरा चेहरादेखील पाहू शकला नाही.

शहीदचे वडील हरबन्स सिंग म्हणाले की, मंगळवारी संध्याकाळी आम्हाला फोन आला की बर्फात अडकल्याने तुमचा मुलगा मरण पावला आहे. वडिलांनी धक्काच बसला. मुलाची आठवण करून देताना वडिलांनी सांगितले की, माझ्या मुलाचे लग्न गेल्या वर्षीच झाले होते. मुलगी परी काही महिन्यांची आहे. संपूर्ण कुटुंब रडण्याच्या अवस्थेत आहे. कुटुंब अत्यंत निकृष्ट स्थितीत राहत असल्याने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. घरात कमावणारा तो एकमेव होता, जो देशासाठी शहीद झाला. दुसरा मुलगा मतिमंद आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/