‘बर्थडे’ दिवशीच ‘शहीद’ झाला लष्करातील जवान, नवविवाहीतेनं मुखाग्निच्या वेळी घेतलं ‘अत्यंदर्शन’

नवीदिल्ली : वृत्तसंस्था – राजस्थानच्या भरतपुरमधील 22 वर्षीय सौरभ कटारा हे आर्मीमध्ये होते आणि जम्मू काश्मीर येथे ड्युटी करत होते. मंगळवारी झालेल्या बॉम्ब स्फोटात त्यांना वीरमरण आले. शहीद जवान सौरभ यांचा विवाह नुकताच 8 डिसेंबर रोजी झाला होता. लग्नानंतर 16 डिसेंबर रोजी लगेच ते कामावर रुजू झाले होते.

बुधवारी सौरभ यांचा वाढदिवस होता त्यांची पत्नी त्यांना जन्म दिवसाच्या शुभेच्छा देण्याच्या तयारीत होती एवढ्यात एका बॉम्बस्फोटामध्ये सौरभ यांना वीरमरण आल्याची बातमी त्यांच्या कुटुंबाला समजली. शहीद सौरभ कटारा यांना अखेरचा निरोप देण्यासाठी हजारोंच्या संख्येने लोक उपस्थित होते. यावेळी सौरभ कटारा यांचे संपूर्ण कुटुंबीय दुःखात बुडाले होते. नवविवाहित पत्नी जोरजोरात आक्रोश करत होती.

shaheed saurabh katara

सौरभ कटारा यांचे वडील नरेश कटारा यांनी सांगितले की, मी स्वतः लष्करात राहून कारगिलचे युद्ध लढले आहे त्यामुळे मला अभिमान आहे की माझा मुलगा देशासाठी शहीद झाला. तसेच आता छोट्या मुलाला देखील लष्करात पाठवणार असल्याचे नरेश कटारा यांनी सांगितले.

नव विवाहित पत्नी पूनम देवी या वारंवार बेशुद्ध पडत होत्या मात्र कसेबसे स्मशानात जाऊन त्यांनी पतीला अखेरचा निरोप दिला. सौरभ कटारा यांचे वडील देखील लष्करातच होते. 2002 मध्ये ते सेवानिवृत्ती झाले तर त्यांचा छोटा भाऊ अनुप कटारा एमबीबीएस करत आहे.

सौरभ 20 नोव्हेंबर रोजी विगत येथे आपल्या बहिणीच्या लग्नात हजार राहिले होते. त्यानंतर 8 डिसेंबर रोजी स्वतःचा विवाह पार पाडून ते लगेच 16 डिसेंबर रोजी कामावर रुजू झाले होते. लग्नाला अजून एक महिनाही पूर्ण झाला नव्हता तेच सौरभ यांना वीरमरण पत्करावे लागले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/