धुळे : मानवी श्रृंखला तयार करून विद्यार्थ्यांनी दिला एकतेचा संदेश

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – सिंधी समाजातील पुत्र शहिद हेमु कलाणी शहीद दिना निमित्त सिंधु रत्न शाळेतील विद्यार्थांनी मानवी श्रृंखला तयार करुन एकतेचा संदेश देत अभिवादन केले.

स्वतंत्रता आंदोलनात सहभाग नोंदवलेले वीर शहिद हेमु कलाणींच्या 76 व्या शहिद दिनानिमित्त सालाबादा प्रमाणे साक्री परिसरातील सिंधुरत्न शाळेतील 500 विद्यार्थीसह पालक, नागरीकांनी एकमेंकांचे हात धरुन मानवी एकता प्रतिक दाखवत मानवी साखळी तयार करुन शहिद हेमु कलाणी यांना अभिवादन केले.

सिंघुरत्न शाळेतील प्रांगणात शहिद हेमु कलाणी याच्या प्रतिमेला महाराष्ट्र राज्य सिंधी साहित्य अकादमीचे माजी सदस्य सुरेश कुंदनानी व राज्य राखीव बल (गट क्रं.6) धुळेचे उप पोलीस अधिक्षक सदाशिव पाटील, एसडीआरएफ पो.नि.रमेश शर्मा यांनी पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी सिंधी समाज अध्यक्ष गुलशन उदासी, जमनु लखवाणी, राजकुमार तोलाणी, सुरेश दंडवाणी, किशोर डियलाणी, उत्तम कुन्दनाणी, लता दंडवाणी, मनिषा डियलाणी, मनोहर ज्ञानचंदाणी, संजय राजाणी, यांनी प्रतिमेला पुष्प अपर्ण करुन अभिवादन केले.

शहिद हेमु कलाणी यांचे जिवनावर आधारीत माहिती चलचित्रा द्वारे 500 विद्यार्थांना दाखविण्यात आली. शाळेत अमर जिवन ज्योतीचा सजिव देखावा सादर करण्यात आला.

फेसबुक पेज लाईक करा –