शहीद जवान प्रफुल्ल गोवंदे यांचा १७ वा स्मृती दिन साजरा

भोकर :  पोलीसनामा ऑनलाईन

पैरा कमांडो प्रफुल्ल कुमार गणपतराव गोवंदे रा भोकर जि नांदेड येथील मूळ चे रहीवासी जम्मू कश्मीर येथे कर्तव्य बजावत असताना छुपवाडा जिल्हा जम्मू कश्मीर येथे आप्रेशन रक्षक करत असताना त्यांना एकूण ३ गोळ्या लागल्या त्या वेळी त्यांनी ७ पाकिस्तानी अतेरिक्याचा खात्मा करून जन्म भूमीचे पांग फेडले असा वीर पुत्र जमीनदोस्त लवकर झाला. नाही तर सर्व अतिरेकी ठार झाल्या नंतर स्वतःच्या प्राणाला दि ०७ ऑक्टोबर २००१ रोजी पूर्ण विराम दिला या शहीद जवानाचा पार्थिव भोकर शहरात दि १२ ऑक्टोबर ला अणण्यात आले तेव्हा संपूर्ण जिल्ह्यातून लोक त्यांना पाहण्यासाठी अंत्यदर्शनासाठी गर्दी केली होती.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’2c82661c-ca39-11e8-952a-29d67853a2ba’]

अनेक वर्षांपासून भोकर शहरातील लोक मोठया भावनेने त्यांचा स्मारकापर्यंत रॅली काढून लेझीम पथक(श्री कृष्ण मंदिर शाळा भोकर),स्काऊट पथक(नूतन प्राथमिक शाळा ,भोकर) घेऊन मिरवणूक काढतात व भोकर शहरातील अनेक मान्यवर ह्या स्मृती दिन पुष्प अर्पण करण्यासाठी येथे स्मारक जवळ येतात सदरील कार्यक्रमात प्रशासकीय अधिकारी मंडळी उपस्थिती न दाखवल्याने अनेक जण नाराज झाले आहेत कार्यक्रम पत्रिकेवर नावे होती प्रशासकीय अधिकारी फिरकलेच नाहीत.

[amazon_link asins=’B01JIPUQS8,B01JIPTPOE,B01GMZJRGO’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’53550ef6-ca39-11e8-8e82-4f9766c9aaf8′]

भोकर शहरात शहीद जवान प्रफुल्ल गोवंदे च स्मारक करण्यासाठी शासनाचे उदासीनता दिसून येत आहे,लोकप्रतिनिधी चे दुर्लक्ष असल्यामुळे स्मारक थांबले आहे असे जेष्ठ पत्रकार एल ए हिरे यांनी यावेळी बोले यावेळी या निंबध परीक्षेत चांगले गुण मिळणाऱ्या विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्यात आले.

सकल मराठा समाजाच्या वतीने चाकण पोलीस स्टेशन समोर आमरण उपोषणाचा इशारा

शहीद प्रफुल्ल गोवंदे यांच्या १७ व्या स्मृती दिनी परिवार मधील आई,वडील,भाऊ,बहीण यांचे अश्रू अनावर झाले होते शहीद जवानांचे पिता गणपतराव गोवंदे,मधुकर गोवंदे(लहान भाऊ) यांना देखील अश्रू अनावर झालेले यावेळी दिसले.

या १७व्या स्मृती दिन वेळी आर एस पडवळ(पोलीस निरीक्षक), गायकवाड प्रशांत(उप जिल्हा अध्यक्ष भाजपा),शिवाजी पा किन्हाळकर,सुभाष पा घंटलवार, युसूफ भाई शेख,एल ए हिरे,दत्ता  डोंगरे,सरोदे सर,दिलीप वाघमारे,गणेश कापसे,कानडे प्रशांत,अर्षद भाई,निशाद इनामदार,सुनिल कांबळे,सुमित सर,जोंधळे राहुल,असंख्य विद्यार्थी, भोकर चे नागरिक उपस्थित होते सूत्रसंचालन राहुल जोंधळे सर यांनी केले.