धक्‍कादायक ! शहिद जवानाच्या पार्थिवावर तिरंग्याऐवजी ‘या’ राजकीय पक्षाचा झेंडा

भुवनेश्वर : वृत्तसंस्था – जम्मू-कश्मीरमध्ये झालेल्या स्फोटात शहीद झालेले जवान अजित कुमार साहू यांच्या पार्थिवावर ‘बीजेडी’ या ओडिशातील सत्ताधारी पक्षाचा लपेटण्यात आल्याचा दावा भाजप नेत्यांनी केला आहे. यामुळे ओडिशातील राजकारण चांगलंच तापलं आहे.

जम्मू-कश्मीरच्या पुलवामा येथे शहीद झालेल्या अजित कुमार यांच्या पार्थिवावर बीजेडी या सत्ताधारी राजकीय पक्षाचा झेंडा लपेटण्यात आला होता, असा दावा भाजपचे नेते बैजयंत जय पांडा यांनी केला आहे. याविषयी त्यांनी एक ट्विट केले आहे. पांडा यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की , ‘अत्यंत दुर्दैवी… शहिदाच्या शवपेटीवर तिरंग्याऐवजी राजकीय पक्षाचा झेंडा लपेटणं हे जवानाच्या वीरमरणावरून राजकारण करण्यासारखं आहे.’ या ट्विटबरोबर त्यांनी ट्विटर हँडलवर फोटो शेयर केला आहे. ज्यामध्ये पार्थिवावर बीजेडीचा झेंडा लपेटलल्याचे स्पष्ट दिसत आहे.

शहीद अजित कुमार साहू ४४ राष्ट्रीय रायफलचे जवान होते. जम्मू-कश्मीरच्या पुलवामा येथे झालेल्या आयईडी स्फोटात शहीद झाले.

सिने जगत –

‘माता-पिता की चरणों में स्वर्ग’ म्हणणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीचा ‘वाढीव’ लुक पाहिलात का ?

…म्हणून सानिया मिर्झा, वीना मलिक यांच्यात ट्विटरवर ‘जुंपली’, पुढे झालं ‘असं’

अभिनेत्री उशोशी सेनगुप्‍ता म्हणाली, गप्प बसली असते तर झाली नसती ‘छेडछाड’ ; ७ गुंडाना अटक

अभिनेत्रीने तिच्या हाताने उचलला तिचा लेहंगा, पुढे झाले असे काही