नवी दिल्ली : Maruti Alto 800 | देशाच्या कार सेक्टरमध्ये कमी बजेटमध्ये जास्त मायलेजचा दावा करणार्या कारची मोठी रेंज आहे, ज्यामध्ये मारुती ऑल्टोचे नाव प्रामुख्याने समोर येते. (Maruti Alto 800)
ऑल्टो ही मारुती कंपनीची बेस्ट सेलिंग कार आहे. मारुती ऑल्टोची शोरूम किंमत 3.15 लाख रुपयांपासून 4.82 लाख रुपयांपर्यंत आहे. तुमचे इतके बजेट नसेल तर सोपे डाऊन पेमेंट आणि ईएमआय प्लानसह खरेदी करू शकता. हा प्लान सविस्तर जाणून घेवूयात.
कार सेक्टरची माहिती देणारी वेबसाईट CARDEKHO वर दिलेला डाऊन पेमेंट आणि ईएमआय कॅलक्युलेटरनुसार, जर तुम्ही मारुती ऑल्टोचे स्टँडर्ड मॉडल खरेदी केले तर कंपनीशी संबंधीत बँक यावर 3.33 लाख रुपयांचे कर्ज देईल.
या लोन आमऊंटवर 37,090 रुपयांचे किमान डाऊन पेमेंट करावे लागेल, ज्यानंतर दरमहिना 7,061 रुपयांचा मासिक ईएमआय भरावा लागेल. कर्ज कालावधी 60 महिन्यांचा असून 9.8 टक्के वार्षिक दराने व्याज भरावे लागेल.
फीचर्स आणि स्पेसिफिकेशन
– मारुती ऑल्टो तीन व्हेरिएंटमध्ये आहे
– इंजिन 796 सीसी, 48 पीएसची पॉवर आणि 69 एनएमचा पीक टॉर्क जनरेट करते.
– मॅन्युअल ट्रान्समिशन.
– मायलेजचा दावा पेट्रोलवर 22.05 किलोमीटर प्रति लीटर आणि सीएनजीवर 31.59 किलोमीटर प्रति किलो.
Web Title :- Maruti Alto 800 | maruti alto 800 with down payment 37 thousand and emi plan read full details
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
- Parineeti Chopra | परिणीती चोप्राने परिधान केला इतका टाईट ड्रेस की अचानक मागून फाटला अन्…
- Pune Rural Police | पुणे जिल्ह्यात माळेगाव, उरुळी कांचन, निरा-नृसिंहपुर नवी पोलीस स्टेशनची निर्मिती ! ‘दौंड’चे विभाजन करुन शिरुर उपविभागीय कार्यालय अस्तित्वात येणार
- Mumbai High Court | कोविडचा ‘सामना’ करण्याबाबत हायकोर्टाने केले ‘ठाकरे सरकार’चे कौतूक