नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Maruti Alto | भारत कारचा सर्वात मोठा ग्राहक आहे. मध्यवर्गातून सर्वात जास्त मागणी बजेट कारची असते. मायलेज कारचा उल्लेख आल्यास ज्या कारचे नाव सर्वप्रथम समोर येते ते नाव आहे मारुती ऑल्टो (Maruti Alto). शोरूममधून मारुती ऑल्टो खरेदी केल्यास 2.99 लाख रुपयांपासून 4.82 लाख रुपयांपर्यंत खर्च करावे लागतात.
गॅरंटी, वॉरंटी आणि कर्ज सुविधा
परंतु आम्ही जी कार सांगत आहोत ती अवघ्या 1 लाख रुपयांच्या बजेटमध्ये खरेदी करू शकता, ज्यामध्ये गॅरंटी, वॉरंटी आणि कर्ज सुविधा मिळत आहे.
मारुती ऑल्टो फीचर्स, स्पेसिफिकेशन आणि मायलेज
– भारताची सर्वात स्वस्त आणि मायलेज कार आहे.
– कारचे तीन व्हेरिएंट आहेत.
– 796 सीसीचे इंजिन जे 0.8 लीटर क्षमतेचे आहे.
– इंजिन 48 पीएसची पावर आणि 69 एनएमचा पीक टॉर्क जनरेट करते.
– मॅन्युअल ट्रान्समिशन.
– कार पेट्रोल वर 22.05 किलोमीटर प्रति लीटर आणि सीएनजीवर 31.59 किलोमीटर प्रति किलो मायलेज देते.
कारवर मिळणारी ऑफर
ही कार सेकंड हँड कार विकणारी वेबसाइट CARS24 ने आपल्या वेबसाइटवर लिस्ट केली आहे. जिची किंमत ठेवली आहे केवळ 1,14,299 रुपये.
80,814 किलोमीटर रनिंग
वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, या कारचे मॉडल 2008 असून ही एक नॉन अॅक्सीडेंटल कार आहे. ओनरशिप फर्स्ट आहे. ती 80,814 किलोमीटर धावली आहे. रजिस्ट्रेशन दिल्ली आरटीओचे आहे.
सात दिवसांची मनी बॅक गॅरंटी
ही कार खरेदी केल्यास कंपनी फ्री आरसी ट्रान्सफर, फ्री थर्ड पार्टी इन्श्युरन्ससह सहा महिन्याची वॉरंटी आणि सात दिवसांची मनी बॅक गॅरंटी देत आहे.
दर महिना 2,731 रुपयांचा मासिक ईएमआय
जर कारवर लोन घ्यायचे असेल तर कंपनी लोनची सुविधा सुद्धा देत आहे. ज्यामध्ये झीरो डाऊन पेमेंटवर ही कार घरी घेऊन जाऊ शकता. पुढील 60 महिन्यासाठी कर्जावर दर महिना 2,731 रुपयांचा मासिक ईएमआय द्यावा लागेल.
Web Titel :- Maruti Alto | second hand maruti alto in 1 lakh with zero down payment and 6 month warranty
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Shivsena | यूपी निवडणूकीत शिवसेना 100 जागा लढणार, संजय राऊत यांची घोषणा
Maharashtra Rains | पुढील चार दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता