मारुती नवलेंच्या मुलाचे लग्न : वऱ्हाडी तुपाशी आणि कर्मचारी पगाराविना उपाशी 

पुणे/जयपूर : पोलीसनामा ऑनलाईन – पुण्यातील सिंहगड संस्थेचे अध्यक्ष मारिती नवले यांच्यावर गेल्या सहा महिन्यांपासून संस्थेच्या प्राध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार थकवल्याचा आरोप आहे. एकीकडे संस्थेच्या कर्मचाऱ्यांचे पगार थकवले जात आहेत मात्र दुसरीकडे नवले त्यांच्या मुलाच्या लग्नात करोडो रुपयांची उधळण केली जात आहे.

प्रियांका निकच्या लग्न महालीच नवलेंच्या मुलाचा विवाहसोहळा

मारुती नवले यांच्या अमित नवले या मुलाचं लग्न ज्येष्ठ अभिनेते कुलभुषण खरबंदा यांच्या मुलीसोबत होणार आहे. नवलेंच्या मुलाचा विवाहसोहळा प्रियांका आणि निकचा जेथे विवाह पार पडला त्या जयपूरमधील भवनात होणार आहे. या सोहळ्याकरिता तीन दिवसांसाठी हा पॅलेस बूक करण्यात आला आहे. या पॅलेससाठी दर दिवसाला ६७ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या लग्नाला येणाऱ्या वऱ्हाडी मंडळींसाठी पुणे, मुंबईहून चार्टर्ड विमानांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच लग्नपत्रिकेसोबत सुका मेवा, महागडी अत्तरे आणि भेटवस्तूदेखील देण्यात आल्या आहेत. नवले यांचा मुलगा रोहित आणि त्याची होणारी पत्नी श्रुती यांचे प्री वेडिंग शूट इटलीत झाले आहे.

नवलेंच्या मुलाच्या लग्नावर इतका भरमसाठ खर्च होत असताना, त्यांच्या संस्थेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मात्र मागील सहा महिन्यांचा पगार दिलेला नाही. त्यामुळे नवले यांच्यावर टीका केली जात आहे.

परंतु हे लग्न म्हणजे वऱ्हाडी तुपाशी आणि कर्मचारी उपाशी असाच प्रकार असल्याचे सध्या बोलले जात आहे. कारण मारुती नवले यांनी ते अध्यक्ष असलेल्या सिंहगड संस्थेत काम करणाऱ्या प्राध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार थकवले आहेत. नवलेंच्या मुलाच्या लग्नातला झगमगाट डोळे दिपवणारा आहे. दुसऱ्या बाजुला त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या डोळ्यासमोर आणि घरात अंधारी आणणारा आहे.

प्राध्यापक आणि शिक्षकांनी केले होते आंदोलन

सिंहगड एज्युकेशन सोसायटीच्या पुण्यातील नामांकीत शैक्षणिक संस्थांच्या कॉलेज-शाळांमध्ये काम करणाऱ्या सुमारे आठ हजार प्राध्यापक, शिक्षक, कर्मचाऱ्यांनाही नियमित वेतन मिळत नसल्यामुळे अनेकदा आंदोलन  केले होते. यावेळी जवळपास ८००० कर्मचाऱ्यांचे वेतन थकवण्यात आले होते. यावेळी  संस्थाचालक मारुती नवले यांनी लवकरात लवकर आमचा पगार द्यावा, आणि तो राष्ट्रीयकृत बँकेत जमा करावा, सहकारी बँकेत नाही, अशा या शिक्षकांच्या प्रमुख मागण्या केल्या. जोपर्यंत पगार मिळत नाही, तोपर्यंत कामावर रुजू होणार नाही, अशी भूमिका या शिक्षकांनी घेतली होती.

संस्थेच्या प्राध्यापकाचा आत्महत्येचा इशारा

सिंहगड आरएमडी स्कूल ऑफ इंजीनियरिंगमध्ये वर्षानुवर्ष काम करूनही वेतन न मिळाल्याने वैफल्यग्रस्त प्राध्यापकाने आता जीवन संपविण्याचा इशारा दिला आहे. मागील महिन्यात याच प्राध्यापकाने आपली सर्व शैक्षणिक कागदपत्रे जाळून टाकल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. आता त्यांचे जीवन संपवून टाकण्याच्या निर्णयाचे पत्र मिळाले आहे. असे असताना संस्थेचे अध्यक्ष नवले मात्र मुलाचे लग्न शाह पद्धतीने लावण्याच्या तयारीत आहेत