Maruti लवकरच लाँच करणार ऑफ रोड SUV Jimny Jeep जी देणार Mahindra Thar ला टक्कर, जाणून घ्या संपूर्ण रिपोर्ट

नवी दिल्ली : Maruti SUV Jimny Jeep | देशातील सर्वात मोठी वाहन उत्पादक कंपनी मारुती सुझुकी लवकरच आपली 3 डोअरची ऑफ रोड एसयूव्ही मारुती जिम्नी लाँच करणार आहे. कंपनीने या SUV चा एक टीझर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर (Maruti SUV Jimny Jeep) जारी केले आहे, ज्यासोबत एक कॅपशन लिहित लोकांना ही एसयूव्ही ओळखण्यास सांगितले आहे.

मार्केटमध्ये हालचाल वाढली

मारुती सुझुकीने या ऑफ रोड एसयूव्हीला 2020 च्या ऑटो एक्सपोमध्ये डिस्प्ले केले होते. मात्र, टीझर जारी झाल्यानंतर या एसयूव्हीच्या लाँचिंगबाबत मार्केटमध्ये हालचाल वाढली आहे.

सध्या तीन डोअर व्हेरिएंटमध्ये येणार

ही ऑफ रोड एसयूव्ही सध्या तीन डोअर व्हेरिएंटमध्ये लाँच करणार आहे. नवी डिझाईन आणि अनेक फीचर्स यामध्ये दिले असून ती प्रीमियम लुक एंड फील देते.

हाय ग्राऊंड क्लियरन्स

मारुती जिम्नीमध्ये फ्रंट (Maruti SUV Jimny Jeep) आणखी आकर्षक बनवत यामध्ये सक्युर्लर हेड लँपसह फॉग लॅम्प आणि नवीन डिझाईनचे बंपर आहे. रस्ता आणि खराब रस्त्यावर चांगल्या पकडीसाठी हाय ग्राऊंड क्लियरन्स बनवले आहे.

4 सिलेंडर इंजिनसह 4 स्पीड मॅन्युअल गियरबॉक्स

एसयूव्हीचे इंजिन 1.5 लीटर क्षमतेचे टर्बो पेट्रोल इंजिन असणार आहे. हे इंजिन 104 पीएसची पावर आणि 138 एनएमचा पीक टॉर्क जनरेट करते. चार सिलेंडर इंजिनसह कंपनी 4 स्पीड मॅन्युअल गियरबॉक्स आणि एएमटी गियरबॉक्सचा पर्याय देणार आहे.

ही आहेत काही खास फीचर्स

– यामध्ये 8.0 इंचाचे टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम, जी अ‍ॅप्पल कारप्ले आणि अँड्रॉईड ऑटो कनेक्टसह कनेक्ट होईल.

– ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल

– क्रूझ कंट्रोल

– कॅमेरासह रियर पार्किंग सेन्सर.

– सुरक्षेसाठी एबीएस, ईबीडी.

– लेन डिपार्चर वॉर्निंग

– डुअल सेन्सर ब्रेकिंग सिस्टम

– फ्रंट सीटवर डुअल एयरबॅग, सारखी फीचर्स दिली जाणार आहेत.

इतकी असेल किंमत

ही एसयूव्ही 10 लाख रुपयांच्या प्रारंभिक किमतीसह लाँच केली जाऊ शकते. तिची स्पर्धा महिंद्रा थार आणि फोर्स गुरखासोबत होणार आहे.

हे देखील वाचा

Petrol Diesel Price Pune | पेट्रोल डिझेलच्या दरातील भाववाढीचा आलेख अजूनही चढताच

Gold Mutual Fund | अवघ्या 500 रुपयात खरेदी करू शकता सोने, Gold मध्ये करा गुंतवणूक; मिळेल शानदार रिटर्न

 

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Maruti SUV Jimny Jeep | maruti suzuki will soon launch jimny jeep to compete with mahindra thar read full report news in marathi

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update