मारुतीने लाँच केले अल्टोचे ‘CNG’ मॉडेल ; ४.११ लाखांपासून किंमत सुरु

नवी दिल्ली : मारुती सुझुकीने दोनच महिन्यापूर्वी नवी अल्टो लाँच केली होती. आता कंपनीने या अल्टोचे CNG मॉडेल देखील बाजारात आणले आहे. नवीन अल्टोला दोन वेगवेगळ्या Xi आणि LXi (O) मध्ये CNG चा पर्याय दिला आहे. याची किंमत अनुक्रमे ४.११ लाख आणि ४. १४ लाख रुपये असणार आहे. ही किंमत या दिवसात चालणाऱ्या पेट्रोल इंजिनच्या मॉडेलपेक्षा ६०,००० रुपयांनी जास्त आहे.

मारुती सुझुकीने CNG च्या नवीन अल्टो मॉडेलच्या टेक्निकल डिटेल्सची माहिती दिलेली नाही. कारच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचं झालं तर अल्टोच्या पेट्रोल डिझेल मॉडेलमध्ये आणि CNG मॉडेलमध्ये काहीही फरक नाही. दोन्ही कारमध्ये पॉवर स्टीयरिंग, एसी, फ्रंट पावर विंडो, सिल्वर इंटीरियर एक्सेंट्स, रिट्रैक्टेबल रियर सीटबेल्ट्स, रियर चाइल्ड लॉक, रिमोट बूट व फ्यूल लिड ओपनर आणि बॉडी कलरमध्ये हैंडल आणि मिरर्स मिळते. LXi (O) मध्ये को-ड्राइवर एयरबैग सुद्धा उपलब्ध आहेत.

नवीन अल्टो नवीन सुरक्षा, एमिशन आणि क्रैश टेस्ट नॉर्म्स च्या रूपात आहे. यामध्ये ७९६ cc चे बीएस६चे ( भारत स्टेज ६) इंजिन दिले आहे. हे इंजिन ५ स्पीड मॅन्युअल ट्रांसमिशन पेक्षा कमी आहे. नव्या अल्टोची सुरवातीची किंमत २.९४ लाख रुपये आहे.