Maruti चा नवीन उपक्रम ! RailWay नं पाठवल्या 6 लाखांपेक्षा जास्त कार, वाचवले 10 कोटी लीटर पेट्रोल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  भारतातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी इंडिया एमएसआयने मागील सहा वर्षात भारतीय रेल्वेने 6.7 लाख कार देशातील विविध भागात विक्रीसाठी पाठवल्या. कंपनीने आज एका वक्तव्यात सांगितले की, यादरम्यान, 18 टक्केपेक्षा जास्त सीएजीआर नोंदले गेले. कंपनीने मार्च 2014 मध्ये डबल डेकर फ्लेक्सी-डेक रॅकद्वारे कारची पहिली फेरी पाठवली होती. मारुतीचे म्हणणे आहे की, कार देशाच्या विविध भागात पाठवण्यासाठी रेल्वेचा वापर केल्याने सुमारे 3000 मेट्रिक टन कार्बन डाय ऑक्साइडचे उत्सर्जन कमी करण्यास मदत केली आहे. यामुळे सुमारे 10 कोटी लीटर जीवाश्म इंधनाची बचत झाली.

जर या कार ट्रकद्वारे पाठवल्या असत्या तर राष्ट्रीय राज्यमार्गावरून एक लाख फेर्‍या माराव्या लागल्या असत्या. मागील अर्थिक वर्षात 1.78 लाखपेक्षा जास्त कार रेल्वेने पाठवण्यात आल्या, ज्या त्याच्या मागच्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत 15 टक्के अधिक आहेत. या वर्षात कंपनीच्या एकुण विक्रीच्या 12 टक्के आहे.

कारच्या वाहतुकीत रेल्वेचे महत्व अधोरेखित करताना एमएसआयचे एमडी आणि सीईओ केनिची आयुकावा यांनी म्हटले की, वाढती विक्री लक्षात घेऊन आमच्या टीमला लार्ज स्केल लॉजिस्टिक्सची गरज भासू लागली. विस्तार आणि रस्त्यावरील धोका टाळण्यासाठी आपल्याला रोड मोड लॉजिस्टिक्सशिवय इतर पर्याय निवडायला पाहिजे, असे आम्हाला वाटत होते.

एका रॅकमध्ये 318 कार

कंपनीने सिंगल डेक वॅगन सुरूवात केली, ज्यामध्ये 125 कारची वाहतूक केली जात होती. नंतर कंपनीने डबल-डेकर रॅक्समध्ये शिफ्ट केले, ज्यामध्ये 265 कार घेऊन जाता येतात. आतापर्यंत याद्वारे 1.4 लाखपेक्षा जास्त कार पाठवल्या आहेत. कंपनी 27 रॅक्सचा वापर करत आहे, ज्या सुमारे 95 किमी प्रति तास वेगाने धावतो. प्रत्येक रॅकमध्ये 318 कार घेऊन जाता येतात.

एमएसआयने दावा केला की, ही देशातील पहिली ऑटो कंपनी आहे, जिला ऑटोमोबाईल फ्रेट ट्रेन ऑपरेटरचे लायसन्स मिळाले आहे. याद्वारे प्रायव्हेट कंपन्या इंडियन रेल्वेच्या नेटवर्कवर हाय स्पीड, हाय कॅपासिटी ऑटो वॅगन रॅक्स ऑपरेट करू शकतात. सध्या कंपनी 5 लोडिंग टर्मिनल आणि 13 डेस्टिनेशन टर्मिनलचा वापर करते. अगरतळाच्या रेल्वे नकाशासोबत जोडले गेल्याने आता रेल मोडचा संपर्क पूर्वोत्तरपर्यंत गेला आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, यामुळे पुर्वोत्तर राज्यांपर्यंत कार पोहचवण्यासाठी पूर्वीपेक्षा अर्धावेळा लागेल.