7-सीटर WagonR ची झलक, लाँच करण्याच्या तयारीत आहे मारुती ?

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : पुन्हा एकदा मारुती सुझुकीच्या ७ सीटर WagonR संदर्भात बातम्या येत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, मारुती सुझुकी आपली ७ सीटर WagonR लॉन्च करू शकते. WagonR मारुतीच्या सर्वाधिक विक्री होणार्‍या कारपैकी एक आहे. माहितीनुसार ७ सीटर WagonR टेस्टिंग दरम्यान दिल्लीजवळ दिसली. जे आता सूचित करते की, मारुती सुझुकी ७ सीटर WagonR वर काम सुरु आहे. दरम्यान मागील वर्षीही ७ सीटर वॅगनआरबद्दल बातम्या आल्या होत्या.

स्टँडर्ड मारुती WagonR च्या तुलनेत टेस्टिंग दरम्यान दिसलेली WagonR जास्त लांब होती. अहवालानुसार, ७ सीटरच्या WagonR ची लांबी स्टँडर्ड मॉडेलपेक्षा शंभर मिमी जास्त असेल, पण कंपनी तिला ४ मीटरपेक्षा कमी सेगमेंटमध्ये लाँच करणार आहे. मात्र मारुती सुझुकीने ७ सीटर WagonR बाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. हिच्या लुकबद्दल बोलायचे झाल्यास 7-सीटर WagonR मध्ये स्टँडर्ड मॉडेलच्या तुलनेत अनेक बदल पाहायला मिळतील. नवीन WagonR मध्ये ग्रील, फ्रंट आणि रीअर बम्पर व स्वतंत्र हेडलॅम्प व टॅलेम्प उपलब्ध असतील. दरम्यान, त्याचे प्लॅटफॉर्म, इंजिन ऑप्शन आणि बहुतेक बॉडी पॅनेल्स WagonR चे असतील.

मारुतीच्या लाइनअपमध्ये ते मल्टी पर्पज व्हेइकल्स (एमपीव्ही) अर्टिगाच्या खाली असेल. नवीन 7 सीटर WagonR ला Renault Triber MPV आणि Datsun Go+ MPV च्या विरोधात लाँच करेल. मागील वर्षाच्या सुरूवातीस असे सांगितले गेले होते की, नवीन 7-सीटर WagonR कंपनीच्या प्रीमियम नेक्सा डीलरशिपद्वारे केवळ विक्री केली जाईल. कारण बाजारात सध्याची WagonR विक्री सातत्याने कमी होत आहे.

नवीन WagonR 7-सीटर MPV मध्ये केवळ 1.2-लिटर पेट्रोल इंजिन दिले जाऊ शकते. हे 1.2-लीटर फोर सिलेंडर पेट्रोल युनिट 82bhp ची उर्जा आणि 113Nm चा पिकअप टॉर्क जनरेट करते. यात 5 स्पीड मॅन्युअल किंवा पर्यायी एजीएस ट्रान्समिशन मिळते. WagonR 7 सीटर मॉडेलची संकल्पना मारुती सुझुकीने इंडोनेशियातील मोटार शोमध्ये 2013 मध्ये सादर केली होती, त्यानुसार इंडोनेशियामध्ये प्रथम लॉन्च केले जाऊ शकतील. भारतीय बाजारातही याची बाजारपेठेत ओळख होणे अपेक्षित आहे.