स्वस्तात खरेदी करा मारूती कार ! 1 लाखापेक्षा जास्त मिळतेय ‘बंपर’ सुट, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतात सुरु असलेल्या मंदीचा सर्वात मोठा फटका सध्या वाहननिर्मिती क्षेत्राला बसताना दिसून येत आहे. वाहननिर्मिती क्षेत्रातील अनेक मोठ्या कंपन्यांना याचा फटका बसला असून होंडा, मारुती यांसारख्या कंपन्या आपले उत्पादन कमी करत आहेत तर काही कंपन्यांनी आपले उत्पादन थांबवले आहे. त्यातच आता मारुतीने आपल्या गाड्यांची विक्री वाढवण्यासाठी गाड्यांवर मोठ्या प्रमाणावर सूट देण्यास सुरुवात केली आहे. देशात सर्वात मोठे कार डिलरशिप असलेल्या मारुती सुझुकी नेक्सा आपल्या गाड्यांवर 1 लाख रुपयांपर्यंत सूट देत असून आम्ही आज तुम्हाला याविषयी माहिती देणार आहोत.

१) S-CROSS
मारुती आपल्या या गाडीवर जवळपास १ लाख रुपयांपर्यंत सूट देत आहे. या गाडीवर तुम्हाला एकूण एक लाख 12 हज़ार 900 रुपयांपर्यंत सूट मिळणार आहे. यागाडीमध्ये 1.3 लीटर क्षमतेचे डिझेल इंजिन असून यामध्ये 5 स्पीड गियरबॉक्स आहे. या गाडीवर तुम्हाला 50 हजार कन्ज्युमर ऑफर तसेच 5 वर्षांची वॉरंटी तसेच 30 हजार रुपये एक्सचेंज ऑफर देखील मिळणार आहे.

२) BALENO (PETROL)
बॅलेनोच्या या व्हर्जनवर तुम्हाला जवळपास 35 हजार रुपयांची सूट मिळणार आहे. यामध्ये 15 हजार रुपये कंज्यूमर ऑफर असून 15 हजार रुपये डिस्काउंट तर 5 हजार रुपये कॉर्पोरेट ऑफर आहे.

Image result for BALENO (PETROL)
३)BALENO (DIESEL)
बॅलेनोच्या या व्हर्जनवर तुम्हाला जवळपास 62,400 हजार रुपयांची सूट मिळणार आहे. यामध्ये 20 हजार रुपये कंज्यूमर ऑफर असून 15 हजार रुपये डिस्काउंट तर 10 हजार रुपये कॉर्पोरेट ऑफर आहे.

४) CIAZ (PETROL)
मिडसाईझ सेडान या प्रकारात मिळणाऱ्या या गाडीवर जवळपास 65,000 रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. यामध्ये 25 हजार रुपये कंज्यूमर ऑफर असून 30 हजार रुपये डिस्काउंट तर 10 हजार रुपये कॉर्पोरेट ऑफर आहे. या गाडीची सुरुवातीची किंमत हि 8 लाख 20 हजार रुपयांपासून सुरु होत आहे.
Image result for CIAZ (PETROL)
५) CIAZ (DIESEL)
या गाडीवर जवळपास 87,700 रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. यामध्ये 25 हजार रुपये कंज्यूमर ऑफर असून 30 हजार रुपये डिस्काउंट तर 10 हजार रुपये कॉर्पोरेट ऑफर आहे. या गाडीची सुरुवातीची किंमत हि 8 लाख 20 हजार रुपयांपासून सुरु होत आहे.

६) IGNIS
या हॅचबॅक कारवर तुम्हाला जवळपास 57,000रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. यामध्ये 30 हजार रुपये कंज्यूमर ऑफर असून 20 हजार रुपये डिस्काउंट तर 7 हजार रुपये कॉर्पोरेट ऑफर आहे . या गाडीची किंमत हि 4.79 लाख रुपयांपासून सुरु होत आहे.

आरोग्यविषयक वृत्त –