वाघोलीत आगीत मारुतीचे शोरुम जळून खाक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – वाघोली येथील वाघेश्वर मंदिराजवळ असलेल्या मारुतीच्या शोरुमला मध्यरात्री लागलेल्या आगीत संपूर्ण शोरुम जळून खाक झाले. सर्व्हर रुममध्ये शॉटसर्किट झाल्याने ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

वाघोलीतील वाघेश्वर मंदिराजवळ मारुतीचे हे शोरुम आहे. मध्यरात्री १ वाजून २० मिनिटांनी या शोरुमला आग लागल्याची माहिती अग्निशामक दलाला मिळाली. त्यापाठोपाठ अग्निशामक दलाची गाडी, पीएमआरडीए, रांजणगाव एमआयडीसीची गाडी घटनास्थळी रवाना झाल्या. अग्निशामक दलाच्या गाड्या पोहचण्यापूर्वीच आग मोठ्या प्रमाणावर भडकलेली होती.

सुमारे ३ हजार स्क्वेअर फुटावर हे शोरुम आहे. या आगीत शोरुममधील गाड्यांचे एक्सेसरिज, गाड्यांचे स्पेअरपार्ट, आफिसमधील सर्व साहित्य, कॉम्प्युटर, सर्व्हर रुम असे सर्व साहित्य जळून खाक झाले. सुमारे दोन तासाच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like