मारवाडी समाजाचा मुकमोर्चा, सुशिलकुमार शिंदेंच्या ‘त्या’ वक्तव्याचा निषेध

पाचोरा : पोलीसनामा ऑनलाइन – नागपूर येथे मारवाडी फाउंडेशनद्वारे दिल्या जाणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी मारवाडी एकेकाळी गरीबांची पिळवणूक करणारा समाज असे अपमानास्पद वक्तव्य करून सकल मारवाडी समाजाचा अपमान केल्याबद्दल मारवाडी समाजाच्या भावना दुखावल्या आहेत.

सकल मारवाडी समाजातर्फे काँग्रेसचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ पाचोरा मारवाडी समाजाचा सर्व सामाजिक संघटनांतर्फे शहराचा न. पा. जिन मधील देवी मंदिरापासून तहसील कचेरीवर मूक मोर्चा काढून शिंदे यांनी मारवाडी समाजाचा केलेल्या अपमानाबद्दल जाहीर माफी मागावी, अशा स्वरुपाचे निवेदन अग्रवाल समाज, श्री वर्धमान स्थानकवाशी, जैन श्रावकसंघ, माहेश्वरी समाज, राजस्थानी वि.प्र. मंडळ यांच्यावतीने तहसीलदार, पोलीस प्रशासनाला देण्यात आले.

यावेळी मारवाडी समाजाचे सामाजिक संघटनेचे अध्यक्षांसह शांतीलाल मोर, कांतीलाल जैन, नितीन राठी, रतन संघवी,महेंद्र संचेती, जगदीश शर्मा, भरत खंडेलवाल, महेंद्र अग्रवाल, भरत शेठ आदिंसह समाजाचे पदाधिकारी व समाज बांधव मोठ्या संख्येने मूक मोर्चात सामील होते.