Mask Benefits | मास्क घालत असाल तर करू नका ‘हा’ निष्काळजीपणा, वाढतो कोरोना आणि ब्लॅक फंगसचा धोका

नवी दिल्ली : वृत्त संस्था – Mask Benefits | इस्रायल आणि अमेरिकेसारख्या देशात लस घेतलेल्या लोकांना मास्क न घालण्याची सूट दिली होती, परंतु यानंतर सुद्धा येथे संसर्गाची प्रकरणे वाढू लागली. यामुळे सीडीसीने पुन्हा एकदा मास्क घालण्याचा सल्ला दिला. भारतात सुद्धा प्रकरणे कमी होताना दिसत नाहीत. अशावेळी मास्कसंबंधी काही गोष्टी जाणून घेणे खुप आवश्यक (Mask Benefits) आहे. जयूपर येथील तज्ज्ञ एसएमएस मेडिकल कॉलेजचे डॉ. एस. बनर्जी (Dr. S. Banerjee) याबाबत काय सांगतात ते जाणून घेवूयात.

– मास्क किती दिवस वापरावा ?

– एन-95 मास्क लावत असाल तर चारवेळा वापरू शकता. परंतु यासाठी किमान चार मास्क खरेदी करावे लागतील. एक मास्क वापरल्यानंतर तो पेपरमध्ये लपटून ठेवा. अशाप्रकारे तीन दिवस नवीन मास्क घाला आणि चौथ्या दिवशी पहिला मास्क घाला. जर कॉटनचा मास्क ऑफिसवरून आल्यानंतर गरम पाण्यात धुवून इस्त्री करून मगच दुसर्‍या दिवशी वापरू शकता. हा मास्क रोज धुणे आवश्यक आहे. कोणताही मास्क लूज लावू नका.

– यावेळी पाऊस आहे, मास्क भिजला तर काय करावे?

– मास्क भिजला तर तो काढून ठेवा. यासाठी सोबत दोन मास्क ठेवा. ते प्लास्टिकच्या थैलीत पॅक करा. भिजलेल्या मास्कमधून व्हायरस बाहेरच्या थरातून लवकरच नाक आणि तोडाद्वारे प्रवेश करू शकतो.

–  घाणेरडा मास्क घातल्याने म्यूकर मायकोसिसचा धोका आहे का?

घाणेरडा मास्क वापरल्याने म्यूकर मायकोसिस होऊ शकतो. अशा केस आल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत.

– तरूणांना पोस्ट कोविडमध्ये काहीही वाचल्यास धाप लागण्याची समस्या होत आहे, कारण काय आहे?

– कोरोनामध्ये फुफ्फुसे प्रभावित होतात. तरूणांमध्ये ही समस्या जास्त आहे. आजही अनेक तरूण निगेटिव्ह आल्यानंतर फुफ्फुसांची समस्या होत आहे आणि आयसीयूमध्ये आहेत. वाचताना श्वास लागण्याची जी समस्या आहे, ती संकेत आहे की फुफ्फुसांवर खुप परिणाम झाला आहे.

– व्हॅक्सीनचा बूस्टर डोस काय आहे?

– ज्याप्रकारे मुलांना डीपीटी किंवा टेटनसची व्हॅक्सीन आहे, यामध्ये आम्ही जेव्हा व्हॅक्सीनचा डोस देतो तेव्हा शरीर त्यांना चांगल्या प्रकारे ओळखते आणि अँटीबॉडी तयार होण्याची प्रक्रिया हळुहळु होते. परंतु जेव्हा आम्ही दुसरा डोस किंवा बूस्टर डोस देतो तेव्हा शरीर अँटीबॉडी तयार करू लागते. यासाठी बूस्टर डोस घेणे आवश्यक आहे.

Web Title : Mask Benefits | coronavirus in india covid vaccine update mask benefits black fungus coronavirus question answer?

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update
 

Latur Crime | जमीनीच्या वादातून उदगीर तालुक्यातील नागलगाव शिवारात गोळीबार

Lisa Haydon च्या मुलांना शाप द्यायला निघाला होता यूजर, अभिनेत्रीच्या एका शब्दाने केली बोलती बंद

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 6,479 नवीन रुग्ण, तर 4,110 जणांना डिस्चार्ज

PIB Fact Check | अर्थ मंत्रालय तुम्हाला सुद्धा देईल दरमहिना 1.30 लाख रुपये कॅश? जाणून घ्या काय आहे पूर्ण प्रकरण