सिंघू बॉर्डर संशयिताला पकडले, 4 शेतकरी नेत्यांना गोळी मारण्याचा होता कट !

नवी दिल्ली : शुक्रवारी सिंघू बॉर्डरवर कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करत असलेल्या शेतकर्‍यांनी एका संशयिताला पकडले आहे, ज्याने सांगितले की, तो कथित प्रकारे चार शेतकरी नेत्यांना गोळी मारण्याच्या हेतूने येथे आला होता आणि त्याचा हेतू 26 जानेवारीला प्रस्तावित शेतकरी ट्रॅक्टर परेडमध्ये अडथळा निर्माण करण्याचा सुद्धा होता. या संशयिताची 10 लोकांची टीम आहे ज्यामध्ये 2 महिला आहेत. या, संशयिताला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

शेतकरी नेते कुलवंत सिंह यांनी सिंघू बॉर्डनवर घेतलेल्या प्रेस कॉन्फरंसमध्ये सांगितले की, शेतकर्‍यांच्या आंदोलनात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यांनी पुढे म्हटले की, मास्क घातलेल्या हा व्यक्ती आणि त्याच्या साथीदारांना धमकावण्यात आले आहे की, जर त्यांनी काहीही माहिती बाहेर सांगितली तर त्यांच्या कुटुंबियांना ठार मारण्यात येईल.

मीडियाशी बोलताना या संशयित व्यक्तीने म्हटले, आम्ही 26 जानेवारीला शेतकर्‍यांना ट्रॅक्टर रॅलीसाठी पुढे जाण्यापासून अडवण्याची योजना बनवली होती आणि जर ते थांबले नसते तर आम्ही अगोदर हवेत फायरिंग करणार होतो आणि आमचे दुसरे साथीदार मागून गोळ्या मारणार होते, जेणेकरून समोर असलेल्या पोलिसांना हे वाटले असते की, त्यांच्यावर शेतकरी गोळ्या मारत आहेत. आमची 10 लोकांची टीम आहे, ज्यामध्ये 2 महिला आहेत.

यानंतर संशयिताने म्हटले, आमच्या टीमला येथे दोन ठिकाणी शस्त्र देण्यात आली होती. 26 जानेवारीसाठी आम्ही योजना बनवली होती की, टीमचे अर्धे सदस्य पोलिसांचा गणवेश परिधान करून राहतील, जेणेकरून शेतकर्‍यांच्या गर्दीला उधळवून लावता येईल. आम्हाला त्या चार लोकांची छायाचित्रे सुद्धा देण्यात आली होती, ज्यांना गोळी मारून ठार करायचे होते. आम्हाला निर्देश देणारा एक व्यक्ती पोलीस दलातील आहे.

त्याने पुढे म्हटले, आम्ही पैशासाठी काम करत आहोत. अजून काही लोक आहेत जे या योजनेत सहभागी आहेत आणि ज्यांना पकडणे बाकी आहे. मी हे निवेदन करतो की, आमच्या कुटुंबियांना हे कळवू नये. आम्हाला वातावरण बिघडवण्यासाठी 10-10 हजार रुपये दिले गेले होते.

संशयिताने यावर जोर देत म्हटले की, 26 जानेवारीला येथे वातावरण बिघडण्याची 100 टक्के शंका आहे. मी येथे वातावरण बिघडवण्यासाठी आलेल्या अन्य लोकांची ओळख सुद्धा दिली आहे. त्यांनी बूट, पगडी आणि जीन्स घातलेली असेल. जे लोक 26 जानेवारीला येथे विध्वंस घडवण्यासाठी येतील, त्यांनी पोलिसांचा गणवेश घातलेला असेल. नंतर या व्यक्तीला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.