मसूद अझहरच्या ‘या ‘ऑडिओ क्लिपने पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहर याची एक ऑडिओ क्लिप समोर आली असून यामुळे पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड झाला आहे. एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, या ऑडिओ टेपमध्ये मसूद अझहरने भारताने बालाकोटमधील आपल्या तळावर हल्ले केल्याचे मान्य केले आहे. हल्ला झाल्यानंतर पाकिस्तानने भारतीय हवाई दलाने निर्जनस्थळी बॉम्ब टाकून पळ काढल्याचा दावा केला होता. मात्र हाफिज सईदच्या ऑडिओ क्लिपमुळे हा दावा फोल ठरला आहे.

पाकिस्तानच्या लष्कराचा खोटारडेपणा – ‘भारतीय हवाईदलाच्या विमानांनी पाकिस्तानच्या हवाई हद्दीत घुसखोरी केली आणि बॉम्बहल्ला केला पण भारताने टाकलेले बॉम्ब निर्जन ठिकाणी पडले, त्या ठिकाणी कोणतीही जीवितहानी झाली नाही, किंवा इतर कोणतही नुकसान झालं नाही. पाकिस्तानच्या हवाई दलाने भारताला तातडीने जोरदार प्रत्युत्तर दिलं, त्यामुळे निर्जन ठिकाणी बॉम्ब टाकून भारताची विमानं परत पळाली’ असा पाकिस्तानचे मेजर जनरल गुफूर यांनी केला होता. मात्र मसूद अझहरच्या याने ऑडिओ क्लिपने पाकिस्तानचा खोटरडेपणा समोर आला आहे.

काल मध्यरात्री तीन ते साडेतीनच्या दरम्यान ‘मिराज २०००’ विमानांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये कारवाई केली. ‘ या कारवाईत हवाई दलाने जैश- ए- मोहम्मदसह हिज्बुल मुजाहिद्दीन आणि लष्कर- ए- तोयबा या दहशतवादी संघटनांचेही तळ उद्ध्वस्त केले. या कारवाईत जैश- ए- मोहम्मद या दहशतवादी संघटेचे कंट्रोल रुम अल्फा- ३ हे संपूर्णपणे उद्ध्वस्त  झाले.  हवाई दलानं जैशच्या ज्या तळावर  कारावाई केली त्यात ३०० हून अधिक दहशतवाद्यांसह  तसेच मसूद अझरचा मेव्हणा मौलाना युसूफ अझर तसेच त्याचे दोन भाऊ ठार झाले आहेत. या हल्ल्यामुळे पाकिस्तानला मोठी चपराक बसली आहे.