मसूद अझर, हाफिज सईद, लखवी आणि दाऊद इब्राहिम भारताकडून UAPA कायद्यांतर्गत ‘दहशतवादी’ घोषित

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहर, लष्कर-ए-तोयबाचा संस्थापक हाफिज सईद, मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड दाऊद इब्राहिम आणि जकी-उर-रहमान लखवी यांना नवीन दहशतवादविरोधी कायदा UAPA (बेकायदेशीर कृती प्रतिबंधक कायदा) अंतर्गत दहशतवादी घोषित करण्यात आले आहे. गृहमंत्रालयाने आज ही माहिती दिली आहे. सर्वांना दहशतवाद्यांच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी गृह मंत्रालयाने अधिसूचना जारी केली आहे.

अलीकडेच हाफिज सईदला पाकिस्तानच्या गुजराणवाला कोर्टाने दोषी ठरवले होते. हाफिज सईदला लाहोर येथून अटक करण्यात आली. सईदला पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातून दहशतवादविरोधी विभागाने (सीटीडी) अटक केली होती. सईदला अटक करण्यात आली असता दहशतवादविरोधी न्यायालयात हजर होण्यासाठी लाहोरहून गुजराणवाला येथे आल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्याच्यावर अनेक खटले प्रलंबित आहेत.

विशेष म्हणजे जुलैमध्ये सरकारने संसदेच्या दोन्ही सभागृहांकडून दहशतवादविरोधी विधेयक मंजूर करून कायदा बनविला. या कायद्यानुसार एखाद्या व्यक्तीला दहशतवादी कार्यात सामील होण्याच्या शक्यतेच्या आधारे दहशतवादी घोषित केले जाऊ शकते.

जे दहशतवाद्यांना आर्थिक आणि वैचारिक मदत देतात आणि दहशतवादाच्या सिद्धांताचा प्रचार करतात त्यांना दहशतवादी घोषित केले जाईल. त्याचबरोबर दहशतवादाच्या प्रकरणात एनआयएचा निरीक्षक स्तरावरील अधिकारीही तपास करू शकेल.

यानुसार जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहर, लष्कर – ए – तोयबाचा संस्थापक हाफिज सईद, मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड दाऊद इब्राहिम आणि जकी उर रहमान लखवी याला नवीन दहशतवादविरोधी कायदा अंतर्गत दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like